मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /...म्हणून रेणू शर्माची नार्को टेस्ट करा; बीडमधील आक्रमक सर्वपक्षीय महिलांची मागणी

...म्हणून रेणू शर्माची नार्को टेस्ट करा; बीडमधील आक्रमक सर्वपक्षीय महिलांची मागणी

बलात्काराचा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील धक्कादायक बाब व्यक्त केली होती

बलात्काराचा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील धक्कादायक बाब व्यक्त केली होती

बलात्काराचा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील धक्कादायक बाब व्यक्त केली होती

बीड, 22 जानेवारी : खोटी तक्रार देऊन बदनामी करणाऱ्या रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा व नार्को टेस्ट करा अशी मागणी बीडच्या सर्वपक्षीय महिलांनी केली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असून या प्रकरणात खरं काय आहे हे समोर यायला हवं, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर रेणू शर्मा यांच्यावर खरोखर अत्याचार झाला असता तर त्यांनी तक्रार मागे का घेतली? याची चौकशी व्हायला हवी. तसंच जर दबाव येत असेल तर त्याबाबत ही चौकशी केली पाहिजे व नार्को टेस्ट केली जावी अशी मागणी करणी सेनाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अॅड संध्या राजपूत यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या गंभीर आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर पीडित महिलेने माध्यमांसमोर हकीकत देखील सांगितली होती. तसेच ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र शर्मा यांनी शपथ पत्र देऊन तक्रार मागे घेतल्याने या प्रकरणात शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

हे ही वाचा-रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा, भाजपच्या महिल्या नेत्याने पोलिसांकडे केली मागणी

तसेच रेणू शर्मा यांनी तक्रार दाखल केल्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व बीड जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असून या प्रकरणात सत्य काय आहे समोर आले पाहिजे. याबाबत बीडमधील भाजपा महिला आघाडी राष्ट्रवादी महिला आघाडी व करणी सेना आक्रमक झाले असून प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवे, यासाठी रेणू शर्मा यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील या महिलांनी केली आहे.

कोण आहे रेणू शर्मा?

महाराष्ट्र सरकारमधील धनंजय मुंडे या बड्या नेत्यावर आरोप करणाऱ्या रेणू अशोक शर्मा या बॉलिवूड गायिका आहेत. रेणू शर्मा यांनी दावा केला आहे की, 1997 मध्ये त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. तेव्हा त्या 16-17 वर्षांच्या होत्या. मध्यप्रदेशात त्यांच्या बहिणीच्या घरी त्यांची भेट झाली होती. 2006 मध्ये त्यांची बहिण इंदुरमध्ये असताना मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता. बड्या निर्मात्याला भेटवण्याच्या आणि बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या नावाखाली त्यांनी वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता.

First published:

Tags: Beed, Dhananjay munde