मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा, भाजपच्या महिल्या नेत्याने पोलिसांकडे केली मागणी

रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा, भाजपच्या महिल्या नेत्याने पोलिसांकडे केली मागणी


'एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करायचे हा धक्कादायक प्रकार आहे. अशा पद्धतीने जर कुणी खोटे आरोप करत असेल तर...'

'एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करायचे हा धक्कादायक प्रकार आहे. अशा पद्धतीने जर कुणी खोटे आरोप करत असेल तर...'

'एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करायचे हा धक्कादायक प्रकार आहे. अशा पद्धतीने जर कुणी खोटे आरोप करत असेल तर...'

मुंबई, 22 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांची अखेर बलात्काराच्या आरोपातून सुटका झाली आहे. तक्रारदार रेणू शर्माने आपली तक्रार लेखी प्रतिज्ञापत्र देऊन मागे घेतली आहे. या प्रकारामुळे भाजपच्या प्रवक्ता चित्रा वाघ यांनी खोटी तक्रार दिल्या प्रकरणी रेणू शर्मावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

गायक असलेल्या रेणू शर्माने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाजप नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण, आता रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपने नवीन भूमिका मांडली आहे.

भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील तक्रारमागे घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. 'धनंजय मुंडे यांच्यावर जेव्हा बलात्काराचा आरोप झाला ही धक्कादायक बाब होती. पण आज बलात्काराची तक्रार मागे घेतली हे सुद्धा तितकेच धक्कादायक आहे. आम्ही या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, आज रेणू शर्माने आरोप मागे घेतला आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई करणे गरजेचं आहे, अशी मागणीच चित्रा वाघ यांनी केली आहे.

'एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करायचे हा धक्कादायक प्रकार आहे. अशा पद्धतीने जर कुणी खोटे आरोप करत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारामुळे ज्या खऱ्या पीडिता आहे त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन हा वेगळा होऊन जातो. त्यामुळे  खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर आयपीसी 192 नुसार मुंबई पोलिसांनी तिच्यावर कारवाई करावी, अशी विनंतीच चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना केली आहे.

रेणू शर्माने लेखी प्रतिज्ञापत्र देऊन तक्रार घेतली मागे

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे.  एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला.

“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी 3 दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.  15 जानेवारीला रेणू शर्माने ट्विट करुन आपण तक्रारार मागे घेत असल्याचे सागंतिले होते.

कोण आहे रेणू शर्मा?

महाराष्ट्र सरकारमधील धनंजय मुंडे या बड्या नेत्यावर आरोप करणाऱ्या रेणू अशोक शर्मा या बॉलिवूड गायिका आहेत. रेणू शर्मा यांनी दावा केला आहे की, 1997 मध्ये त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. तेव्हा त्या 16-17 वर्षांच्या होत्या. मध्यप्रदेशात त्यांच्या बहिणीच्या घरी त्यांची भेट झाली होती. 2006 मध्ये त्यांची बहिण इंदुरमध्ये असताना मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता. बड्या निर्मात्याला भेटवण्याच्या आणि बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या नावाखाली त्यांनी वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता.

First published:
top videos