आधी कुपोषण आता अंधश्रद्धेचा कळस, पोटफुगीमुळे चिमुकल्यांना दिले लोखंडी सळीचे चटके

आधी कुपोषण आता अंधश्रद्धेचा कळस, पोटफुगीमुळे चिमुकल्यांना दिले लोखंडी सळीचे चटके

नुकताच मेळघाटातील बोरधा या गावात श्याम सज्जू तोटा या 8 महिन्याच्या बालकाला पोटफुगी आजारावरून पोटाला गरम सळीचे चटके देण्याचा प्रकार उघड झाला आहे.

  • Share this:

मेळघाट, 22 जून : गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटातील कुपोषनाचा प्रश्न गंभीर असताना मेळघाटातील अशिक्षित आदिवासी अंधश्रद्धेचे बळी होतांना दिसताहेत. नुकताच मेळघाटातील बोरधा या गावात श्याम सज्जू तोटा या 8 महिन्याच्या बालकाला पोटफुगी आजारावरून पोटाला गरम सळीचे चटके देण्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर बोरधा नजीकच्या बारुगव्हान गावात निकिता दिलीप चीमोटे या 2 वर्षाच्या बालिकेलाही चटके दिल्याचं सांगितलं जात आहे.

या 2 बालकांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 1 महिन्यांपूर्वी प्रजल लखाजी धिकार या 2 वर्षाच्या बाळालासुध्दा पोटाला चटके दिले असल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर मेळघाटातील बोर्धा आणि बारूगव्हाण ही गावं अतिदुर्गम आहेत. या गावात बससुध्दा जात नाही. अमरावतीवरून मध्यप्रदेश आणि नंतर या गावात जावं लागतं.

पिपंरी चिंचवड हादरलं! दोन दिवस मित्राला डिझेलनं झाळलं, तुकडे करून फेकलं नदीत

पावसाळ्यात लहान बालकांचं पोट दुखायला लागलं की गावातील मांत्रिक म्हणजेच भूमका किंवा घरातील मोठी व्यक्ती पोटावर गरम विळ्याने किंवा सलाखीने चटके देतात. बारूगव्हाण या गावात प्रजल लखाजी धिकार या २ वर्षाच्या बाळाला खुद्द त्याच्या आजीनेच गरम सळाखिने चटके दिल्याचं समोर आलं आहे. बुलीया भिकार या महिलेने प्रज्वल या बाळाच्या वडिलांना तसेच स्वतःला सुद्धा चटके दिले होते. रुग्णालयापेक्षाही चटके दिल्यानंतरच आराम पडतो असं बुलिया भिकार हीचं म्हणणं आहे.

श्याम सज्जु तोटा व निकिता दिलीप चिमोटे या दोन बालकांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या दोन्ही बालकांना भेटण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

गावात वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती झाली असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, या गावापर्यंत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. गावापर्यंत बस नाही. अनेक ठिकाणी डॉक्टरची पदे रिक्त असल्याचं मेळघाटात काम करणाऱ्या खोज या स्वयंसेवी संस्थेच्या पूर्णिमा उपाध्याय यांनी सांगितलं. त्यामुळे अजूनही इथली लोकं अशा प्रकारे अंधश्रद्धेचे बळी पडतात.

सरकारने सैन्यासाठी 2018मध्ये घेतलेला हा निर्णय आता चीनला पडणार महागात

संपादन - रेणुका धायबर

First published: June 22, 2020, 9:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या