मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /5000 रुपयांच्या आतले सर्वात चांगले SmartPhones कुठले? पाहा फीचर्स आणि तुलनेसह संपूर्ण लिस्ट

5000 रुपयांच्या आतले सर्वात चांगले SmartPhones कुठले? पाहा फीचर्स आणि तुलनेसह संपूर्ण लिस्ट

Best Smartphones under 5000: नवा फोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे? तुम्हाला प्राधान्याने हवी ती फीचर्स असलेला सर्वोत्तम फोन कुठला हे ठरवायला ही लिस्ट मदत करेल.

Best Smartphones under 5000: नवा फोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे? तुम्हाला प्राधान्याने हवी ती फीचर्स असलेला सर्वोत्तम फोन कुठला हे ठरवायला ही लिस्ट मदत करेल.

Best Smartphones under 5000: नवा फोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे? तुम्हाला प्राधान्याने हवी ती फीचर्स असलेला सर्वोत्तम फोन कुठला हे ठरवायला ही लिस्ट मदत करेल.

नवी दिल्ली, 21 जानेवारी - Smartphones under 5000 ः स्मार्टफोनचे (Smart Phone) जग सातत्यानं वाढत आहे. हजारोंपासून लाखो रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोननी बाजार (Smart Phone Market) भरलेले आहेत. काही लोकं तर स्मार्टफोनसाठी इतके क्रेझी असतात, की काही दिवसांच्या आतच ते स्मार्टफोन बदलत असतात. स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. आपल्या जीवनातला बहुतांश महत्त्वाचा भाग स्मार्टफोनमध्येच लपलेला असतो. इतकी आवश्यकता असतानाही कोट्यावधी लोकांकडे अजूनही स्मार्टफोन पोहोचलेला नाही.

स्मार्टफोन लाँच होताच, अनेक लोक त्याच्या किमती ऐकूनच मागे हटतात. परंतु सगळेच स्मार्टफोन महाग असतात असे काही नाही. फोननिर्माता कंपन्या प्रत्येकाचा विचार करून वेगवेगळ्या रेंजचे फोन मार्केटमध्ये घेऊन येतात. बाजारात स्वस्त स्मार्टफोनची कमतरता नाही. इथं आम्ही 5,000 से 6,000 रुपयांपर्यंतच्या रेंजचे स्मार्टफोनची (Smartphones under 5000) चर्चा करत आहोत.

हे वाचा   Amazon: खरेदी करा WiFi वर चालणारा गिझर, Alexa वरुनही देता येईल कमांड

जास्त किमती असलेल्या स्मार्टफोनप्रमाणेच या फोनमध्ये सर्व वैशिष्ट्ये आहेत.

Samsung Galaxy M01 Core

स्मार्टफोनच्या दुनियेत सॅमसंग एक स्थापित नाव आहे. सॅमसंगचा गॅलेक्झी एम01 कोर फोन 5000 रुपयांपर्यंत खरेदी केला जाऊ शकतो. 5.30 इंच स्क्रीन असलेल्या हा स्मार्टफोन MT6739 प्रोसेसरने ऑपरेट केला जातो. एक जीबी रॅम असलेल्या या फोनच्या रियरमध्ये 8 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 5 एमपी चा कॅमेरा आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 3000एमएएच क्षमता असलेली बॅटरी लावण्यात आली आहे. Samsung Galaxy M01 Core या स्मार्टफोनमध्ये 16 जीबीची स्टोअरेज क्षमता आहे. दुसरे कार्ड लावून तो वाढवला जाऊ शकतो. हा फोन काळा, निळा आणि लाल रंगात उपलब्ध आहे.

Tecno Pop 5 LTE

परवडणाऱ्या दरात फोन बनवणारी कंपनी टेक्नोसुद्धा आता स्मार्टफोनच्या बाजारात आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहे. Tecno Pop 5 LTE स्मार्टफोनच्या के 2GB RAM + 32GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,299 रुपये आहे.

 हे वाचा  एका चुकीने हॅकर्सकडे जाईल तुमचा WhatsApp अ‍ॅक्सेस, अशा मेसेज, लिंकवर क्लिक करू नका; पोलिसांचा इशारा

हा स्मार्टफोन Amazon वरून SBI  क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करून खरेदी केला, तर तुम्हाला 1,000 रुपयांची सूट मिळू शकते.

I KALL Smartphones

आय कॉलच्या स्मार्टफोननेसुद्धा कमी किमतीत चांगले फिचर उपलब्ध करून दिले आहेत. I KALL Z1 4G स्मार्टफोनची किंमत 6499 रुपये आहे. परंतु Amazon वर हा फोन 5499 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन ब्ल्यू आणि ग्रे रंगात उपलब्ध आहे. या फोनची मेमरी स्टोरेज क्षमता 32 जीबी आहे. या फोनच्या मागे 8MP कॅमेरा आणि फ्रंटवर 5MP चा कॅमेरा लावण्यात आला आहे. भारतात निर्मिती होणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले, मल्टी-टच कॅपेसिटिव्ह टच स्क्रीन 480×960 पिक्सल रिझॉल्यूशन देण्यात आले आहे. 4GB RAM आणि 32GB स्टोरेज क्षमता असलेला स्मार्टफोन सामान्य माणसाच्या गरजेत अगदी फिट बसतो.

Itel A25 Pro Smartphone

इंटेलचा स्मार्टफोनसुद्धा खूपच परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. Itel A25 Pro स्मार्टफोन 5,099 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. 2 GB RAM  आणि 32 GB  स्टोरेज क्षमतेचा हा स्मार्टफोन निळ्या रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 1.4 GHz Quad Core Processor वर चालतो. तसेच फोनमध्ये 3020 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia 1 smartphone

नोकिया 1 स्मार्टफोनची किंमत 4,672 रुपये आहे. हा फोन Android 8.0 Oreo वर ऑपरेट होतो. नोकिया वनमध्ये 4.5 इंचाचा HD IPS डिस्प्ले दिलेला आहे. या फोनमध्ये मागे LED flash सोबत 5 एमपी कॅमेरा लावण्यात आला आहे. फ्रंटमध्ये 2MP चा सेल्फी कॅमेरा आहे. 1GB RAM आणि 8GB स्टोरेज क्षमतेचा या फोनमध्ये Bluetooth 4.0 जीपीएससारखे फिचर्सही देण्यात आले आहेत.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphones