मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धक्कादायक, अवघ्या 4 वर्षांच्या आदित्य हत्तीचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक, अवघ्या 4 वर्षांच्या आदित्य हत्तीचा दुर्दैवी मृत्यू

10 जून रोजी मुसळधार पाऊस झाल्याने आदित्य नावाचा हत्ती मध्यरात्री चिखलात अडकला होता.

10 जून रोजी मुसळधार पाऊस झाल्याने आदित्य नावाचा हत्ती मध्यरात्री चिखलात अडकला होता.

10 जून रोजी मुसळधार पाऊस झाल्याने आदित्य नावाचा हत्ती मध्यरात्री चिखलात अडकला होता.

गडचिरोली, 29 जून : सिरोंचा वनविभागांतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील हत्ती कॅम्पमधील अवघ्या चार वर्षाचा आदित्य नावाच्या हत्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

10 जून रोजी मुसळधार पाऊस झाल्याने आदित्य नावाचा हत्ती मध्यरात्री चिखलात अडकला होता.11 जून रोजी सकाळी 8:15 वाजेच्या सुमारास त्याला चिखलातून बाहेर काढण्यात आले होते. मात्र,चिखलातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अस्वस्थ झाला. तो खूप थकलेला आणि घाबरलेला होता.

शहरात कोरोनामुळे कोंडी, महामार्गावर वाहतूक कोंडी, पाहा हे ठाण्यातील PHOTOS

वन विभागाने त्याच्यावर स्थानिक पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू केले होते. त्याने खाणेपिणे सोडून दिले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती आहे.

अखेर आज पहाटे आदित्य नावाच्या हत्तीचा पिल्लू ने अखेरचा श्वास घेतला. नेमकं वनविभागाने जर विशेष लक्ष देऊन तज्ञ पशुवैदयकीय अधिकाऱ्यांना आणले असते तर, असा प्रकार घडला नसता अशी चर्चा सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये अशाच पद्धतीने चार हत्तींचा मृत्यू झाला होता.

संपादन - सचिन साळवे

First published: