मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नियम मोडून मोटार सायकलवर डबल सीट, रिक्षामध्ये 3 प्रवासी असेल आणि चारचाकीमध्ये तीन व्यक्ती असेल तर ठाणे आणि मुंबई पोलीस कारवाई करत आहे.
ठाण्यात रविवारपासून कडक नियमाद्वारे नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात एकूण 1941 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापैकी पंधराशे 1553 दुचाकी, 166 रिक्षा आणि 222 चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली.
त्याचप्रमाणे राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार, गाडी न चालवल्याने ही कारवाई होत आहे. यामध्ये दुचाकीवर डबल सीट बसणे, रिक्षामध्ये आणि चारचाकी वाहनांमध्ये जास्त प्रवासी असणे या नियमाच्या उल्लंघन साठी कारवाई सुरू आहे.