Home /News /news /

धक्कादायक! 2 वर्षांच्या चिमुरडीला 32 वेळा भोसकलं, प्रियकरासाठी सख्ख्या आईनंच घेतला जीव

धक्कादायक! 2 वर्षांच्या चिमुरडीला 32 वेळा भोसकलं, प्रियकरासाठी सख्ख्या आईनंच घेतला जीव

या महिलेने मुलीला मारल्यानंतर तिला शालमध्ये गुंडाळून घराबाहेरील कचरा पेटीत फेकून दिलं

    नवी दिल्ली, 19 मार्च : 25 वर्षांच्या आईनेच आपल्या 2 वर्षांच्या मुलीला 32 वेळा सुऱ्याने भोसकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर या महिलेने मुलीचा मृतदेह शालमध्ये गुंडाळून कचरा पेटीत फेकून दिला. घरी आल्यानंतर या महिलेने खूनाचे सर्व पुरावे संपवले आणि आपल्या प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेवले व झोपून गेली. महिलेच्या या कृत्याचा जेव्हा न्यायालयात खुलासा झाला तेव्हा आश्चर्याने सर्वांचेच डोळे मोठे झाले. न्यायालयाने महिलेला या गुन्ह्यासाठी दोषी ठरविलं आहे. आता ती आपलं बाकीचं आयुष्य तुरुंगात घालवत आहे. हे वाचा - 'बुलाती है मगर जाने का नई', Coronavirus वर मुंबई पोलिसांनी शेअर केलं मीम कॅनडा येथे राहणाऱ्या या महिलेचं नाव अॅन्ड्यू गगनॉन आहे. तिने एप्रिल 2018 मध्ये चार्ल्सबर्ग क्युबेक सिटी येथील आपल्या घरी आपल्याच 2 वर्षांची चिमुरडी रोजाली हिची हत्या केली होती. 'द सन' या वृत्तात आलेल्या बातमीनुसार ती ते कृत्य करताना दारु व अमली पदार्थाच्या नशेत होती. याबाबत न्यायालयात आरोपीच्या वकिलाने सांगितले की, ही महिला लहानपणापासून अनाथालयात राहिली आहे. ती मानसिक रुग्ण आहे. याशिवाय तिला अनेक शारिरीक समस्या असल्याने ती त्रस्त होती. या प्रकरणात महिला दोषी असल्याचे न्यायालयाने सांगितले आणि तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय14 वर्षांपर्यंत तिला पॅरोलशिवाय तुरुंगात राहण्याचा आदेश दिला आहे. हे वाचा  - मानेतील 'हे' हाड तुटल्यानंतरच मिळेल 'निर्भया'च्या नराधमांना मृत्यू
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या