नवी दिल्ली, 19 मार्च : देशाला हादरावून सोडणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना आता फासावर लटकावले जाणार हे निश्चित झालं आहे. दोषींनी फाशीच्या शिक्षा टाळण्यासाठी आटोकात प्रयत्न केला परंतु, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यामुळे सर्व नराधमांना फाशीच्या तख्तापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निर्भया प्रकरणातील प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हरिनगरमधील दीनदयाल उपाध्याय रुग्णालायातील वैद्यकीय तपासणी विभागाचे प्रमुख डॉक्टर बीएन मिश्रा यांनी 'आजतक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फाशीच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली. 'ज्यावेळी एखाद्या दोषीला फाशीची शिक्षा दिली जाते, तेव्हा शरीर हे काही काळ प्रतिसाद देत असतं. जेव्हा फास बसतो तेव्हा मानेतील 7 हाडांना एकच झटका बसतो, त्यामुळे एका सेंकदात शरिराला मोठा झटका लागतो. तेव्हा मानेतील एक हाड हे निघून जाते आणि मनक्यात रुतते. त्यामुळे शरीरात न्यूरोलॉजिकल अॅटॅक येतो आणि माणसाचा काही मिनिटात मृत्यू होता.फासावर लटकवलेल्या दोषी काही सेंकदामध्ये जीव सोडून देतो.'
गळफास घेऊन आत्महत्या, गळा दाबून जीव घेणे आणि फाशी यात वेगळवेगळी लक्षणं आहे. फाशी ही एक न्यायिक प्रक्रियेचा भाग आहे. तर गळफास घेऊन आत्महत्या करत असताना गळा आणि श्वास घेणारी नलिका दबल्यामुळे मेंदूत रक्ताचा प्रभाव बंद पडतो. त्यामुळे 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यू होतो.
काही गुन्हेगारीच्या प्रकरणात हत्या करण्याच्या हेतूने एखाद्याला फासावर लटकवले जाते. तर काही प्रकरणात दोर किंवा तार गळ्यात अडकल्यामुळे मृत्यू होतो. सर्व प्रकरणात वेगवेगळी लक्षणं आहे.
तिहारच्या मध्यवर्ती कारागृहाचे निरीक्षक सुनील गुप्ता यांनी सांगितलं की, 'माझ्या कारकिर्दीत 7 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली. 1982 मध्ये रंगा आणि बिल्ला या दोघांना फाशी देण्यात आली होती. पण, फाशी दिल्याच्या 2 तासांनंतरही रंगा दोषीच्या धमन्या सुरूच होत्या. त्यामुळे फासावर लटकलेल्या रंगाला त्याच परिस्थितीत खालून ओढण्यात आलं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.'