Home /News /news /

हिंगोलीतून धक्कादायक बातमी, CRPF जवानांनी मुंबईत दिला कोरोनाला लढा, पण गावी पोहोचल्यावर...

हिंगोलीतून धक्कादायक बातमी, CRPF जवानांनी मुंबईत दिला कोरोनाला लढा, पण गावी पोहोचल्यावर...

हिंगोलीमध्ये 69 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

    कन्हैयालाल खंडेलवाल, प्रतिनिधी हिंगोली, 05 मे : कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत असून   हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाचा आकडा हळूहळू वाढत जात आहे. जिल्ह्यात  राज्य राखीव दलाच्या 22 जवांनासह एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाने दिलासा व्यक्त केला होता. मात्र, सोमवारी रात्री उशिरा रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल समोर आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव दलाच्या 22 जवांनासह एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. हेही वाचा -व्हायरसशी दोनहात करणाऱ्या कोरोना योद्धांचा असा असावा दिवसभरातील आहार सोमवारी  4 मे रोजी रात्री उशिरा हा अहवाल प्राप्त झाला. मुंबई येथे बंदोबस्ताहून परतलेल्या येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) 22 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. श्रीनिवास यांनी सोमवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास दिली. बाधीत जवानांची संख्या आता 69 (एक जालन्यातील) झाली आहे. दरम्यान, येथील जिल्हा रुग्णालयातील 24 वर्षीय परिचारिकेचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हिंगोलीत आता कोरोनाबाधितांची संख्या 73 झाली असून, त्यातील एक रुग्ण यापूर्वीच बरा झाला आहे. त्याला घरी जाऊ देण्यात आले आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या