कोरोनाग्रस्तांना जगवणारा Ventilator च जीवघेणा ठरतोय?

कोरोनाग्रस्तांना जगवणारा Ventilator च जीवघेणा ठरतोय?

न्यूयॉर्कमध्ये ventilator असलेल्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 12 एप्रिल : कोरोनाव्हायरसच्या (CoronaVirus) गंभीर रुग्णांवर उपचारासाठी जगभरातील सर्व देश अतिरिक्त वेंटिलेटरची (ventilators) व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे काही डॉक्टर कोरोनाग्रस्तांसाठी वेंटिलेटरचा वापर करणं टाळत आहेत. एपी न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.

काही रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या बहुतेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर आलीत. वेंटिलेटरमुळे काही रुग्णांना नुकसान पोहोचू शकतं, असं डॉक्टरांना वाटतं.

ज्यांचं फुफ्फुस नीट काम करत नाहीत अशा रुग्णांना वेंटिलेटर ठेवलं जातं. अशा रुग्णांच्या घशात एक ट्युब घातली जाते आणि ऑक्सिजन पोहोचवलं जातं. अशा गंभीर परिस्थितीत पोहोचलेल्या रुग्णांचा मोठ्या संख्येने मृत्यू होतो आहे.

तज्ज्ञांच्या मते, श्वास घेण्यात गंभीर समस्या असलेल्या 40 ते 50 टक्के रुग्णांचा मृत्यू वेंटिलेटरवर होतो. मात्र न्यूयॉर्कमध्ये वेंटिलेटरवर असलेल्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होतो आहे.

अमेरिकन लंग असोसिएशनचे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. अल्बर्ट रिजो यांनी अमेरिकेत सामान्यपेक्षा अधिक मृत्यू दर येत असल्याचं सांगितलं आहे. असेच काही रिपोर्ट चीन आणि ब्रिटनमधूनही आहेत. यूकेतील एका रिपोर्टनुसार अशा 66% तर वुहानमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार 86% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही काळानंतर वेंटिलेटर रुग्णांना नुकसान पोहोचवत असावेत कारण त्यांच्या फुफ्फुसात लहान जागेत उच्च दबावात ऑक्सिजन पोहोचवलं जातं.

टोरंटो जनरल हॉस्पिटलमधील श्वसनसंबंधी आजारांचे तज्ज्ञ डॉ. एडी फान म्हणाले, "वेंटिलेटर फुफ्फुसातील जखमेला अधिक बिघडवू शकतं, असं गेल्या काही दशकात दिसून आलं आहे. त्यामुळे याचा वापर करताना खबरदारी घ्यावी लागेल"

कोरोनाला रोखण्यासाठी परदेशी मीडियाकडून केरळचं केलं जातंय कौतुक

अमेरिकेतून भारतात येतोय कोरोना? न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण...

First published: April 13, 2020, 8:01 PM IST

ताज्या बातम्या