जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अरे बापरे! सरकारी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट आले पॉझिटिव्ह, तर खासगी लॅबमध्ये निगेटिव्ह

अरे बापरे! सरकारी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट आले पॉझिटिव्ह, तर खासगी लॅबमध्ये निगेटिव्ह

हा नॅशनल एक्सपर्ट ग्रुप (National Expert Group) केंद्र सरकारने तयार केला असून त्यात संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी आहेत.

हा नॅशनल एक्सपर्ट ग्रुप (National Expert Group) केंद्र सरकारने तयार केला असून त्यात संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी आहेत.

खासगी लॅबमधील आठ पॉझिटिव्ह रिपोर्टपैकी सहा रिपोर्ट हे सरकारी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत निगेटिव्ह आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेरठ, 26 मे : गुरुग्रामच्या खासगी पॅथॉलॉजी लॅब, मॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरमध्ये कोरोनाच्या तपासणीत डीएम मेरठ अनिल धिंग्रा यांनी मोठा घोटाळा पकडला आहे. खासगी लॅबमधील आठ पॉझिटिव्ह रिपोर्टपैकी सहा रिपोर्ट हे सरकारी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत निगेटिव्ह आले आहेत. या प्रयोगशाळेच्या तपासणीस प्रतिबंधित करीत डीएमने तत्काळ सीएमओला लॅबविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले. गेल्या काही दिवसांपासून, गुरुग्रामच्या मॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरच्या तपासणीत अनेक प्रकरणं पॉझिटिव्ह समोर आली होती. एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह झाल्यावर आरोग्य विभागाला संशय आला. गेल्या दोन दिवसांत आणखी आठ नमुने पॉझिटिव्ह आले. आरोग्य विभागाने संशयाच्या आधारे डीएमला माहिती दिली. आनंदाची बातमी! US च्या या कंपनीने सुरू केलं कोरोनाच्या लसीचं माणसांवर ट्रायल डीएमच्या सूचनेवरून गेल्या दोन दिवसांच्या आठ पॉझिटिव्ह अहवालांशी संबंधित व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आणि त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले गेले. तपासणीत आठ पैकी सहा अहवाल निगेटिव्ह असल्याच आढळलं. या खासगी लॅबमध्ये सुरू असलेला तपास डीएमने थांबवला आहे. यासह त्यांनी सीएमओ आणि सरकारला पत्र लिहून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. लॅबचा परवाना रद्द करण्याचीही सरकारनं शिफारस केली आहे. पुढचे 5 दिवस या राज्यांसाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती खाजगी प्रयोगशाळेतील निष्काळजीपणा मेरठचे डीएम अनिल धिंग्रा यांचं म्हणणं आहे की, ही खासगी लॅबची मोठी उपेक्षा आहे. आठ पैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह चे निगेटिव्ह आले. त्या आधारे लॅबचा परवाना रद्द करावा आणि कायदेशीर कारवाई करावी असं पत्र सरकारला पाठवण्यात आलं आहे. तसेच सीएमओलाही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत 1253 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे, 24 सकारात्मक सीएमओ डॉ. राजकुमार म्हणाले की, गुरुग्रामच्या पॅथॉलॉजी लॅब मॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्चमधून आतापर्यंत 1253 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 24 पॉझिटिव्ह आढळले आहेत. एका महिलेचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह असल्याच्या संशयाच्या आधारे क्रॉस तपासणी केली गेली. महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला. आईनं सासूला फसवण्यासाठी लेकराचा दिला बळी, 3 महिन्याच्या बाळाला संपवलं आणि…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात