मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Beed News : विमानात कधीही न बसलेला जिल्हा परिषदेचा विद्यार्थी करणार नासासाठी उड्डाण! Video

Beed News : विमानात कधीही न बसलेला जिल्हा परिषदेचा विद्यार्थी करणार नासासाठी उड्डाण! Video

X
Beed

Beed News : आजवर एकदाही विमानात न बसलेला बीड जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आता थेट नासासाठी उड्डाण करणार आहे.

Beed News : आजवर एकदाही विमानात न बसलेला बीड जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आता थेट नासासाठी उड्डाण करणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी

    बीड, 17 मार्च : विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी शाळा आणि महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सहलीचं आयोजन केलं जातं. देशातील ऐतिहासिक स्थळं, विज्ञानातील प्रयोग यासह वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांची ओळख करुन देण्यासाठी या सहलीचं आयोजन करण्यात येतं. बीड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना तर चक्क भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि अमेरिकेची जगप्रसिद्ध अंतराळ संस्था नासाला सहलीनिमित्त भेट देण्याची संधी मिळणार आहे.

    जगभरात होणाऱ्या नवनवीन प्रयोगाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या पुढाकारातून ही सहल आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाभरातील 110 विद्यार्थ्यांपैकी 33 विद्यार्थ्यांची निवड झाली असून यापैकी 11 जण नासा तर 22 जण इस्रोला जाणार आहेत. नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बीड तालुक्यातील चौसाळा या गावातील शिवप्रसाद कोकाटेचा समावेश आहे.

    Beed News: आठवीतला अभय करणार 'इस्रो'ची वारी, पाहा त्यानं कसं मिळवलं यश? Video

    बीड तालुक्यातील चौसाळा, गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणारा शिवप्रसाद कोकाटे सातवीमध्ये शिकतोय. नासाची वारी करण्यासाठी आवश्यक असणारी प्रवेश परीक्षा तो पास झालाय. या परीक्षेत तो 60 मार्कांसह तालुक्यात पहिला आलाय.  सामान्य कुटुंबातील शिवप्रसादला नासा पाहण्यासाठी निवड झाल्यानं त्याच्या गावात आनंदाचं वातावरण आहे. संपूर्ण तालुक्यातून त्याचं अभिनंदन होतंय.

    पहिल्यांदाच विमाननं प्रवास

    मी या परीक्षेसाठी खूप अभ्यास केला होता. परीक्षेचे तीन्ही टप्पे मी उत्तीर्ण झालो आहे. यासाठी विज्ञान आणि गणित हे मुख्य विषय होते. त्यासाठी लागणारी सर्व पुस्तकं आमच्या शाळेतील शिक्षकांनी उपलब्ध करुन दिली. मला आता अमेरिकेत जाण्याची संधी मिळालीय याचा खूप आनंद आहे. अमेरिकेत मला तेथील शास्त्रज्ञ तसंच नासा संस्थेचं काम जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. मी या निमित्तानं पहिल्यांदाच विमानात बसणार आहे,' अशी प्रतिक्रिया शिवप्रसादनं दिली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Beed, Local18, Nasa, School