• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • पंतप्रधानांसमोर उद्धव ठाकरे म्हणाले, भारत मजबूत आहे, मजबूर नाही; डोळे काढून हातात देऊ

पंतप्रधानांसमोर उद्धव ठाकरे म्हणाले, भारत मजबूत आहे, मजबूर नाही; डोळे काढून हातात देऊ

शिवसेना पक्ष प्रमुख आणि महराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या चीन संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीत सहभागी झाले.

 • Share this:
  मुंबई, 19 जून: शिवसेना पक्ष प्रमुख आणि महराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या चीन संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी चीनबाबत राग व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत शांत आहे. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा होत नाही. भारत मजबूत आहे, मजबूर नाही. आमच्यात डोळे काढून हातात देण्याची क्षमता आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी चीनला इशारा दिला. आपण सगळे एक आहोत. चीनविरोधात सरकार जे काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा असेल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांही आमचा पाठिंबा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला 20 राजकीय पक्षांना निमंत्रण होतं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांनी आपण सरकारसोबत असून,  महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलविलेल्या चीन संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीत सहभागी झाले. चीन दरम्यान सुरू असलेले तणाव हा डिप्लोमायटीक पद्धतीने सोडवावा, असं सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली. सीमेवर जैसे थे परिस्थिती राहिल, असं आश्वासन देशाला द्या, असं त्या पंतप्रधानांना म्हणाल्या. चीनच्या वादावर नेमकं काय सुरू आहे? सध्या काय चाललं आहे? हे आम्हा विरोधीपक्षांना काहीही माहित नाही. त्याची वळोवेळी माहिती दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षांना पूर्णपणे अंधारात ठेवलं गेलं असंही त्या म्हणाल्या. ही सर्वपक्षीय बैठक आधीच घ्यायला पाहिजे होती, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. हेही वाचा.. दरम्यान, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षामुळे सीमेवर तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे.
  First published: