Home /News /news /

हे डॉक्टर कधीपासून झाले? शिवसेनेनं फडणवीसांना फटकारलं

हे डॉक्टर कधीपासून झाले? शिवसेनेनं फडणवीसांना फटकारलं

'फडणवीस साहेब, मुख्यमंत्री ठाकरे यांना सल्ले देऊ नका. त्यांना त्यांचे काम करू द्या. तुम्ही मुख्यमंत्री होतात. तुमचे निर्णय तुम्ही घेतले आहेत.'

    मुंबई, 20 एप्रिल : महाराष्ट्रापुढे कोरोना संकट उभे ठाकले आहे. परंतु, अशाही परिस्थितीत भाजपकडून राज्य सरकारवर एकही टीकेची संधी सोडत नाही. शिवसेनेनंही आपल्या मुखपत्र असलेल्या 'सामना'तून विरोधकांवर टीकेचे बाण सोडले आहे. वृत्तपत्र सुरू करण्यात आले पण वितरणांना परवानगी न देण्यावरून सेनेनं देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच फटकारून काढले आहे. 'लोकांना आपापल्या जीवाची काळजी आहे व सरकार लोकांसाठी काम करीत आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस सांगतात, ‘वृत्तपत्र वितरणावरील बंदी उठवा. हे बरोबर नाही.’ फडणवीस साहेब, मुख्यमंत्री ठाकरे यांना सल्ले देऊ नका. त्यांना त्यांचे काम करू द्या. तुम्ही मुख्यमंत्री होतात. तुमचे निर्णय तुम्ही घेतले आहेत. श्रीमान फडणवीस सांगतात, ‘जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा वृत्तपत्रे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे!’ श्रीमान फडणवीस हे डॉक्टर कधीपासून झाले? ' असा सवाल करत सेनेनं फडणवीसांना सणसणीत टोला लगावला. हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये घरातलं तांदूळ संपलं म्हणून जंगलातून किंग कोब्रा मारून आणला तसंच, ' अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे आपल्या मोदी यांचे मित्र आहेत. ट्रम्प बोले मोदी डोले ही स्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटना ही बकवास आणि खोटारडी असल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी आता जागतिक आरोग्य संघटनेचा निधीच रोखला आहे. तेव्हा मुंबईत बसून कोणी जागतिक आरोग्य संघटनेची ‘तबलिगी’ करू नये', असा सल्लावजा टोलाही फडणवीसांना लगावण्यात आला. सामन्याच्या अग्रलेखात काय म्हटलंय? मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांत वृत्तपत्रांचे वितरण बंद आहे. चौदा एप्रिल रोजी पहिला ‘लॉक डाऊन’ संपण्याआधीच काही वृत्तपत्रांनी छपाई सुरू केली होती, पण छापलेली वर्तमानपत्रे वाचकांपर्यंत जाण्याच्या सर्व यंत्रणा जीवाच्या भीतीने ‘लॉक डाऊन’ झाल्याने छापलेले गठ्ठे रद्दीत जाऊ लागले. भांडवलदारी वृत्तपत्रांना रद्दीचे वेड आहे व ते वेड त्यांना परवडते. त्यांच्या धंद्याचे गणित खपाच्या आकड्यांपेक्षा रद्दीच्या गठ्ठ्यांतून सुरू होते. पण अनेक मध्यममार्गी वर्तमानपत्रांना हे कसे परवडेल? आता महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढून वृत्तपत्रांना ‘लॉक डाऊन’मधून बाहेर काढले, पण घरोघरी वितरण करण्यावर मात्र निर्बंध घातले आहेत. हेही वाचा -महाराष्ट्राच्या आणखी एका जिल्ह्याने घेतला मोकळा श्वास, कोरोना झाला हद्दपार!   वृत्तपत्र छपाईला परवानगी, पण वितरणाला बंदी हा ठाकरे सरकारचा अजब फतवा असल्याची टीका सुरू झाली आहे. हा प्रकार म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला वगैरे असून या तुघलकी आदेशाविरुद्ध निषेध-आंदोलने करण्याची फर्माने काही पत्रकार संघटनांनी सोडली आहेत. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीदेखील या आदेशाचा फेरविचार करावा व हे आदेश म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटनेचा संदर्भ देण्यात आला आहे. पण डॉ. आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांच्या जिवाशी, आरोग्याशी खेळा, लोकांचे बळी घ्या असेही कोठे घटनेच्या कलमात लिहून ठेवल्याचे सापडत नाही. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्यात या वितरणवाल्या गरीब मुलांना स्थानच नाही' वृत्तपत्रांवर कोणतेही निर्बंध असू नयेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोणत्याही प्रकारची मुस्कटदाबी होऊ नये या मताचे आम्ही आहोत, पण हे झाले आपल्या कलमबहाद्दरांचे मत, पण वृत्तपत्र वितरणासाठी जी हजारो गोरगरीब मुले रस्त्यात उतरणार आहेत ती मुले, त्यांची कुटुंबे, वृत्तपत्र स्टॉलधारक यांचे मत या अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाल्यांनी विचारात घेतले आहे काय? आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात या वितरणवाल्या गरीब मुलांना स्थानच नाही. आम्ही आमचा धंदा बघतो. या पोरांचे काय ते त्यांनी पाहावे. हा विचार विचित्र वाटतो. मुंबईसारख्या शहरात, पुण्यात, संभाजीनगरात, नागपुरात कोरोनाचे संक्रमण थांबलेले नाही. अनेक ‘हॉट स्पॉट’ क्षेत्रांत या वितरणवाल्यांचे वास्तव्य आहे. ही सर्व मुले सकाळी चार वाजल्यापासून एकत्र येतात. नंतर घरोघरी वर्तमानपत्रे वाटण्यासाठी जातात. मात्र कोरोनाच्या भीतीने अनेक गृहनिर्माण सोसायटय़ांनी ठराव करून या वृत्तपत्र वितरणवाल्यांचा प्रवेश रोखला आहे. यावर आपले अभिव्यक्तीवाले काय करणार? या सगळय़ांत आमचा ‘सामना’ही भरडलाच गेला आहे व आम्ही हे भरडणे सहन करीत आहोत. किती मालक यासाठी पुढाकार घेणार आहेत? इटलीसारख्या देशात वर्तमानपत्र हातात धरायला पुढची पिढी शिल्लक राहील काय ही भीती आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन व प्रिन्स चार्ल्सही कोरोनाग्रस्त झाले. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य अबाधित असताना त्यांना विजनवासात जावे लागले. ब्रिटनच्या राजवाड्यात व पंतप्रधानांच्या घरी आता वृत्तपत्रांवर निर्बंध आले आहेत, हे आम्हाला दुर्दैवाने सांगावेसे वाटते. हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये मास्क घातलं नाही म्हणून पित्यानं दिव्यांग मुलाला संपवलं वृत्तपत्रांचे वितरण सुरळीत व्हावे व टिळक, आगरकर, अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांचे हे शस्त्र तेजाने तळपत राहावे. हे शस्त्र कोणालाही मोडता येणार नाही, ते बोथट होणार नाही, पण करायचे काय? वृत्तपत्र छापत राहू. लोकांची म
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या