मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

साईभूमी शिर्डी हादरली, कोरोनाशी महिलेची झुंज अपयशी

साईभूमी शिर्डी हादरली, कोरोनाशी महिलेची झुंज अपयशी

खोलीतून दुर्गंधी आल्यानंतर रविवारी तिने दार ठोठावलं, मात्र आतून आवाज आला नाही.

खोलीतून दुर्गंधी आल्यानंतर रविवारी तिने दार ठोठावलं, मात्र आतून आवाज आला नाही.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा आता 2 वर पोहोचला आहे.

शिर्डी, 14 एप्रिल :  अहमदनगर जिल्ह्यातील  कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. शिर्डीतील कोपरगावमध्ये कोरोनाबाधित एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा आता 2 वर पोहोचला आहे. कोपरगाव शहरातील एका 60 वर्षीय महिलेला सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने तीची कोरोना चाचणी केली गेली. यात तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 11 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हेही वाचा - लॉकडाऊन वाढवला पण 20 एप्रिलनंतर 'या' भागात शिथिल होणार नियम या महिलेचा कोरोनाचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील लोकांची यादी तयार करण्यात आली होती. एकूण 14 जणांची चाचणी करण्यात आली होती. परंतु, या 14 ही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. याआधी श्रीरामपूर येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा पुण्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 28 वर पोहोचला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोपरगाव शहरात कडकडीत लॉकडाउन करण्यात आला असून अत्यावश्यक सेवाही बंद आहे. नेवासा, कोपरगाव, संगमनेरमध्ये 100 टक्के बंद पाळण्यात येत आहे. हॉस्पिटल आणि रेशन व्यतिरीक्त सगळं बंद ठेवण्यात आले आहे. कोपरगाव शहरात कडकडीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन तहसीलदारांनी केलं आहे. हेही वाचा - LockDown मध्ये 'गूगल पे'ची खास सेवा, घरातून बाहेर पडण्याआधी चेक करा संगमनेर, राहाता,श्रीरामपूर जामखेड, पाथर्डी पाठोपाठ कोपरगाव शहरातही कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरीक धास्तावले आहेत. संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या