जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मुंबई: 'आम्ही भाडं नाही देऊ शकत...'; शॉवरला गळफास लावून व्यावसायिकाची पत्नीसह आत्महत्या

मुंबई: 'आम्ही भाडं नाही देऊ शकत...'; शॉवरला गळफास लावून व्यावसायिकाची पत्नीसह आत्महत्या

मुंबई: 'आम्ही भाडं नाही देऊ शकत...'; शॉवरला गळफास लावून व्यावसायिकाची पत्नीसह आत्महत्या

कांदिवली इथे राहणाऱ्या एका जोडप्याने राहत्या घरातच आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून एक सुसाईड नोटदेखील मिळाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑगस्ट : राज्यावर कोरोनामुळे भीषण परिस्थिती ओढावली आहे. यामुळे अनेकांवर आर्थिक संकट आलं आहे. यातून मुंबईत आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांदिवली इथे राहणाऱ्या एका जोडप्याने राहत्या घरातच आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून एक सुसाईड नोटदेखील मिळाली आहे. बुधवारी सकाळी व्यावसायिक जिग्नेश दोशी (वय 45) आणि त्यांची पत्नी काश्मीरा (वय 40) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. या जोडप्याला एक 17 वर्षीय मुलगा आहे. मृतदेहाच्या शेजारी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. कोरोनाच्या आर्थिक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून घर भाडं देऊ शकले नसल्याने या जोडप्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ‘साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते’ मुलगा जेव्हा रात्री 11च्या सुमारास घरी गेला तेव्हा त्याने आईला मृत अवस्थेत बेडवर पाहिलं. त्यानंतर तो ओरडत वडिलांना आवाज देत दुसऱ्या खोलीत गेला ते कुठेही बाबा दिसले नाहीत. तितक्यात मुलाच्या लक्षात आलं की, बाथरुमचा दरवाजा हा आतून बंद आहे. त्याने क्षणाचाही विचार न करता दरवाजा तोडला. त्यानंतर मात्र त्याच्या पायाखालची जमीन हादरली. तुकाराम मुंढे यांसोबत या अधिकाऱ्यांचीही झाली बदली, अशी मिळाली नवी पदं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश यांनी बाथरुममधील शॉवरला गळफास घेत आत्महत्या केली. मुलाने तात्काळ घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली आणि यानंतर पोलिसांना प्राचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जिग्नेश आणि काश्मीरा यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मोहिते-पाटीलांच्या राजकारणाला पहिल्यांदा विरोध करणाऱ्या चरणुकाका यांचं निधन दोन्ही मृतदेहाची कोविड चाचणी केली असल्याचीही माहिती समोर येत आहे. डॉक्टर रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत. या प्रकरणी शेजाऱ्यांची चौकशी केली असता जिग्नेश हे शेअर ट्रेडर असल्याचं सांगण्यात आलं. पण कोरोनाच्या संकटात त्यांना मोठा आर्थिक फटला बसला आणि म्हणून त्यांनी अशी टोकाची भूमिका घेत आपलं आयुष्य संपवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात