तुकाराम मुंढे यांसोबत या 16 अधिकाऱ्यांचीही झाली बदली, अशी मिळाली नवी पदं

तुकाराम मुंढे यांसोबत या 16 अधिकाऱ्यांचीही झाली बदली, अशी मिळाली नवी पदं

मुंबई इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिवपदी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बुधवारी बदली करण्यात आली. मुंबई इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिवपदी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त असणार आहे. तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील 16 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यात लोकेश चंद्र यांची नियुक्ती प्रधान सचिव, जलसंपदा विभाग येथे, ए.बी. मिसाळ यांची बदली विभागीय आयुक्त, कोकण विभाग येथे तर श्रीमती अंशु सिन्हा यांची बदली सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग इथे करण्यात आली आहे.

त्याचबरोबर एस.एम देशपांडे यांची नियुक्ती प्रधान सचिव (प्र.सु. व र.व का.) या पदावर केली आहे. श्रीमती दिपा मुधोळ यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई येथे तर सी. के. डांगे यांची बदली संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा,पुणे येथे करण्यात आली आहे.

एका क्षणात गायब झाला भला मोठा पूल, पाहा धक्कादायक अपघाताचे भीषण PHOTOS

कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?

अधिकारी                                     आधी                                                आता

सीताराम कुंटे                     अति. मुख्य सचिव                          अति. मुख्य सचिव (गृह)

(सामान्य प्रशासन)

सुजाता सौनक                    अति. मुख्य सचिव                          अति. मुख्य सचिव

कौशल्य विकास                             (सामान्य प्रशासन)

तुकाराम मुंढे                      आयुक्त, नागपूर मनपा                    महाराष्ट्र जल प्राधिकरण

अविनाश ढाकणे                 जिल्हाधिकारी, जळगाव                  परिवहन सचिव

शेखर चन्ने                           परिवहन सचिव एमडी,                    MSRTC

'साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते'

राधाकृष्णन बी.                   मुंबई हाऊसिंग बोर्ड                       आयुक्त, नागपूर मनपा

अण्णासाहेब मिसाळ           नवी मुंबई मनपा आयुक्त                कोकण विभागीय आयुक्त

के. व्ही. जाधव                    जॉईंट सीईओ, MIDC                    नाशिक मनपा आयुक्त

लोकेश चंद्रा                        एमडी, सिडको                               प्रधान सचिव, जलंधारण

PHOTOS: मुंबईत भलं मोठं झाडं पडलं, थोडक्यात टळली मोठी जीवितहानी नाहीतर...

दरम्यान, तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना ते सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा वादात सापडले होते. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. यावरून तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली होती.

तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? अशाप्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर भाजपचे महापौर आणि नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 27, 2020, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading