नवी दिल्ली, 04 सप्टेंबर : तुम्हाला घरबसल्या हजारो रुपये कमवायचे असतील तर तुमच्यासाठी मोदी सरकारने मोठी संधी दिली आहे. ही कोणतीही बचत योजना नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या खिशातील पैसे टाकून त्याबदल्यात जास्त पैसे मिळतील असं बिलकुल नाही. तर ही एक स्पर्धा आहे. मोदी सरकारला एका गोष्टीसाठी तुमची मदत हवी आहे, त्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि या स्पर्धेसाठी 50 हजार रुपयांचं बक्षीस जारी करण्यात आलं आहे. 2023 हे वर्ष International year of millets जाहीर करावं, असा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत दिला होता. भारताचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 70 पेक्षा जास्त देशांनी याला समर्थन दिलं आहे. वातावरण बदलासारख्या कठीण परिस्थितीत बाजरीचे आरोग्यासाठी फायदे आणि शेतीसाठी त्याची उपयुक्ततात याबाबत जनजागृती करणं हा यामागील उद्देश आहे. आता यासाठी एक स्लोगन आणि लोगो हवा आहे. त्यासाठी मोदी सरकारने सामान्यांसाठी स्पर्धा आयोजित केली.
Put your creative hat on!
— MyGovIndia (@mygovindia) September 3, 2021
Share your innovative logo & unique slogan for International Year of Millets 2023 and win ₹50,000!
Visit: https://t.co/vhj1PB1VOK for more details. pic.twitter.com/wiqgW1Na9e
My Gov India च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरसुद्धा याबाबत माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत तुम्हाला सहभागी व्हायचं असे तर 17 सप्टेंबर 2021 ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. हे वाचा - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी! 50 लाख जणांना जॉबची संधी स्लोगन आणि लोगोसाठी प्रत्येकी तीन विजेते निवडले जातील. ही स्पर्धा जिंकणाऱ्याला पहिल्या विजेत्याला बक्षीस म्हणून 50 रुपये दिले जातील. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या विजेत्यासाठी अनुक्रमे 25,000, 10,000 रुपयांचं बक्षीस असेल. तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर myGov.in पोर्टलवर जा. इथं कॉनटेस्ट सेक्शनमध्ये जाऊन लॉग इन टू पार्टिसिपेट टॅबवर क्लि करा. त्यानंतर नोंदणीसाठी आवश्यक माहिती भरायची. नोंदणीनंतर तुमची एंट्री दाखल करावी लागेल. हे वाचा - गुंतवलेले पैसे कधी होणार दुप्पट?या एका फॉर्म्युल्यामुळे एका मिनिटात मिळेल माहिती अधिक माहितीसाठी myGov.in या लिंकवर क्लिक करा.