नवी दिल्ली : सध्याच्या काळात प्रत्येक जण गुंतवणुकीवर (Investment) भर देत असतो. गुंतवणूकीतून दुप्पट फायदा (Double Profit) व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची चाचपणी संबंधित गुंतवणूकदाराकडून (Investor) केली जाते. परंतु, काही लोक असे असतात की अन्य पर्यायांचा विचार न करता एफडीत (FD) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. या लोकांकडूनही माझी रक्कम दुप्पट कधी होईल असा प्रश्न विचारला जातो. गुंतवणूक करताना लोक अनेक प्रकारची गणितं मांडत असतात. परंतु, एक असं गणित असतं की ज्यामुळे तुम्हाला रक्कम दुप्पट कधी आणि कशी होईल हे एका मिनिटात समजू शकतं. याबाबतचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`नं दिलं आहे. जाणून घेऊया या गणिताविषयी सविस्तर...
तुम्ही गुंतवलेले पैसे कधी दुप्पट होतील, याविषयी एका मिनिटात माहिती मिळू शकते. कारण अशा प्रकारचे गणित करण्यासाठी `रूल ऑफ 72` चा वापर केला जातो. `रूल ऑफ 72` हे गणितातील समीकरणावर आधारित तंत्र असून, यातून गुंतवलेली रक्कम कोणत्या वर्षी दुप्पट होणार हे सहजपणे समजू शकतं.
`रूल ऑफ 72` च्या माध्यमातून गुंतवलेले पैसे कधी दुप्पट होणार याची माहिती मिळू शकते. दुप्पट रकमेबाबत जाणून घेण्यासाठी या नियमात व्याज दरानुसार गणित केलं जातं. या नियमानुसार, व्याजदराने 72 ला भागलं असता जो आकडा येतो, त्या वर्षाच्या संख्येत एखाद्या व्यक्तीची गुंतवणूक ही दुप्पट होऊ शकते. या माध्यमातून एफडीसारख्या गुंतवणुकीबाबत योग्य उत्तर मिळू शकतं.
समजा एखाद्या गुंतवणुकीवर तुम्हाला 6 टक्के व्याज मिळत असेल तर तुम्हाला 6 ने 72 ला भागावं लागेल. त्यातून जो आकडा येईल तो दुप्पट रक्कम मिळण्याचे वर्ष असेल. 12 वर्षांत 6 टक्के व्याजदर असेल तर रक्कम दुप्पट होईल. तसंच 9 टक्के व्याजानं 8 वर्षांत तुमची गुंतवणूक दुप्पट होईल. अशा पध्दतीने तुम्ही तुम्हाला मिळत असलेल्या व्याज दराच्या माध्यमातून पैसे किती दिवसात दुप्पट होतील याचा अंदाज लावू शकता आणि त्यानुसार गुंतवणूकीचे नियोजनही करू शकता.
हे ही वाचा-'या' Mutual Fundमध्ये करा गुंतवणूक आणि मुलांच्या खर्चामधून व्हा Tension Free
खरं तर सध्या म्युचअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचा योग्य मार्ग आहे. याशिवाय किसान विकास पत्र योजनेतूनही पैसे दुप्पट होऊ शकतात. सध्या यात 6.9 टक्के व्याजदर (Interest Rate) दिला जात आहे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एक लाख रुपयांची गुंतवणूक यात केली तर विशिष्ट कालमर्यादेत तुम्हाला त्याबदल्यात 2 लाख रूपये मिळू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money