'लठ्ठ असल्यानं जोडीदारासमोर निर्वस्त्र होताना लाज वाटते; हा न्यूनगंड कसा दूर करू?'

'लठ्ठ असल्यानं जोडीदारासमोर निर्वस्त्र होताना लाज वाटते; हा न्यूनगंड कसा दूर करू?'

Sexual wellness : माझ्या जोडीदारानं मला यासाठी कधी दोष दिला नाही किंवा नावं ठेवली नाहीत; पण मलाच मी कुरूप असल्यासारखे वाटते, असं अनेकांना वाटतं. मनातील या विचारापासून कशी मुक्ती मिळवावी याबाबत तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला.

  • Share this:

प्रश्न : आयुष्यात मी बॉडी इमेजबाबतच्या समस्येला खूप वेळा सामोरं गेले आहे. मी आधीपासून जास्त वजन असलेली, अति लठ्ठ किंवा गुबगुबीत आहे. माझ्या जोडीदारानं मला यासाठी कधी दोष दिला नाही किंवा नावं ठेवली नाहीत; पण मलाच मी कुरूप असल्यासारखे वाटते. खरं तर, आपण दिसायला सुंदर नाही आहोत ही भावनाच माझ्या या समस्यांचं मूळ आहे, असं मला वाटतं. आपली इच्छा असल्यास मी याबद्दल अधिक सांगू शकते, पण माझ्या शरीराबद्दल बोलताना मी खूपच ओशाळवाणे होते. विशेषतः माझ्या जोडीदारासमोर निर्वस्त्र होताना मला खूप संकोच वाटतो. माझ्या जोडीदारानं कधीही असं म्हटलेलं नाही; पण मलाच कसंतरी वाटतं. तरीही यामुळे माझ्या जोडीदाराबरोबरच्या माझ्या शारीरिक संबंधांवर काही परिणाम झाला आहे, असं मला वाटत नाही. पण असं नेहमीच छान नसेल तर...

उत्तर - 'सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं', माझी ही आवडती उक्ती मी वारंवार सांगते. तुमचं सौंदर्य किंवा आकर्षकपणा हे तुमच्या शरीराचा आकार कसा आहे, तुमचा रंग कसा आहे किंवा तुम्ही किती उंच आहात यापेक्षा तुमच्याकडे पाहणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. त्यांना तुम्ही सुंदर वाटत असल्यास, तुम्ही सुंदर आहात. तुम्ही म्हणता की, तुम्हाला तुमच्या कोणत्याही रोमँटिक किंवा सेक्स पार्टनरनं तुम्ही आकर्षक नाहीत, असं कधीही म्हटलेलं नाही. याचा अर्थ तुम्ही त्यांच्याबरोबर असणं त्यांना आवडतं,  तुमच्यावर प्रेम करायला त्यांना आवडतं, तुम्ही त्यांना हव्या असता, कारण त्यांना तुम्ही आकर्षक वाटता. ते तुमच्यावर प्रेम करून किंवा तुमच्याशी लैंगिक संबंध ठेवून तुमच्यावर उपकार करत नाहीत; ते हे करतात कारण त्यांनाही ते हवं आहे, हे लक्षात घ्या.

तुम्ही कधीतरी शर्ट किंवा कपडे खरेदी करण्यासाठी दुकानात गेला असाल, ते आठवा. तुम्ही दुकानात असलेले सर्व कपडे न्याहाळता आणि त्यातून रॅकवर असलेला एक निळा शर्ट उचलता. कारण तो तुम्हाला खूप आवडलेला असतो. तुम्ही तो विकत घेता कारण तो शर्ट खूप सुंदर आणि स्टायलिश आहे, असं तुम्हाला वाटतं.

हे वाचा - 'जोडीदारासोबत भावनिक नातं पण सेक्ससाठी मनात दुसरीच स्त्री; हे योग्य आहे का?'

आता दुकानात उरलेल्या शर्टसबद्दल विचार करा. अशी कल्पना करा की, तिथं एक पिवळ्या रंगाचा शर्ट आहे. जो आपल्याला बिलकुल आवडलेला नाही. तुमच्या मनात येतं, 'ओ माय गॉड, किती वाईट डिझाइन आहे हे,  मला फुकट दिला किंवा त्यासाठी पैसे दिले तरीही मी हा शर्ट घेणार नाही'. भूतकाळात कमीतकमी एक शर्ट तरी तुम्ही असा बाजूला ठेवला असणार. क्षणभर विचार करा,  रॅकवर पिवळ्या रंगाचा शर्ट कशाला आहे, असं का वाटतं? तुम्ही विकत घेतलेल्या शर्टइतकीच त्याची किंमत का आहे? दुकानदारानं हा पिवळ्या रंगाचा शर्ट उत्पादकाकडून का खरेदी करून दुकानात विक्रीसाठी ठेवला असेल?

तो शर्ट तिथं आहे कारण कोणीतरी दुकानात येणार आहे आणि त्याच रॅकमधील पिवळा शर्ट बघून, अरे वा! किती सुंदर शर्ट आहे. मला तो घ्यायचा आहे! असं म्हणणार आहे. तुम्ही तुमचा आवडता निळ्या रंगाचा शर्ट खरेदी करून आनंदी झाला होतात, तसंच तो पिवळा शर्ट घेणारी व्यक्ती आनंदी होईल. आनंदानं ती तो घालेल, तिला तो खुलूनही दिसेल. कदाचित कुणीतरी तुम्ही घेण्यापूर्वी निळा शर्ट पाहिला असेल आणि मला फुकट दिला तरी मी हा शर्ट घेणार नाही, असाच विचार केला असेल.

जसं दुकानात प्रत्येक शर्टसाठी एक ग्राहक आहे, तसंच तुम्ही कशाही दिसत असा, काही लोकांना तुम्ही आकर्षक वाटाल, तर काही लोकांना तुम्ही आकर्षक वाटणार नाही. कोणतंही शरीर आकर्षक किंवा कुरूप नाही.

हे वाचा -  Sexual Wellness : 'मला Sex addiction आहे, त्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी काय करू?'

सौंदर्याची व्याख्याही बघणाऱ्याच्या डोळ्यांवर अवलंबून असते, असं म्हणतात. हे तुम्हालाही लागू होतं. तुम्ही स्वतःला पाहता तेव्हा तुम्हाला तुमच्यातील सौंदर्य दिसत नाही? नसेल तर का?   एखाद्या ठराविक प्रकारच्या शरीरयष्टीत किंवा स्टाईलमध्ये आपण अधिक आकर्षक वाटू, असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल तर त्यावर काम करा. त्यादृष्टीनं बदल करा; पण लक्षात ठेवा की हे तुम्ही दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी करत आहात. दुसऱ्या कुणासारखं दिसण्यासाठी तुम्ही हे करत नाहीत, हे लक्षात घ्या.

तुम्हाला स्वतःसाठी चांगलं दिसायचं असेल, तर चांगली वेषभूषा करा, मेक-अप करा, जिमला जा. स्वत:ला सांगा की तुम्ही सुंदर आहात. आपल्या शरीराचं कौतुक करा आणि छोट्या छोट्या यशासाठी स्वत:ला बक्षीस द्या. लक्षात ठेवा की तुम्हीच तुमचे सर्वात चांगले मित्र आहात.

Published by: Priya Lad
First published: December 30, 2020, 11:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading