Home /News /lifestyle /

Sexual Wellness : 'मला Sex addiction आहे, त्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी काय करू?'

Sexual Wellness : 'मला Sex addiction आहे, त्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी काय करू?'

जेव्हा सेक्सची इच्छा होईल आणि कुणी पार्टनर नसेल पण तेव्हाच्या तेव्हा सेक्सची इच्छा पूर्ण करायची आहे, यासाठी काय मार्ग आहेत. याबाबत सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टनी दिलेला हा सल्ला.

प्रश्न : मी तामिळनाडूमधील 22 वर्षीय तरुण आहे. माझी लैंगिक इच्छा (Sexual Desire) खूपच तीव्र असून माझा त्यावर ताबा नाही. मी त्याच्या आहारी गेलो असून यासाठी मला एका पार्टनरची गरज आहे. माझी इच्छा  झाल्यास माझ्याबरोबर सेक्स चॅट करण्यासाठी मला पार्टनर हवा आहे. उत्तर : सेक्स ॲडिक्शन (Sex Addiction) किंवा हायपरसेक्सुअल डिसऑर्डर (Hypersexual Disorder) ही खूपच सामान्य स्थिती असून योग्य उपचारांच्या मदतीने तुम्ही यातून बाहेर पडू शकता. तणाव, नैराश्य, चिंता आणि लाज यांसारख्या समस्यांमुळे हा आजार उद्भवू शकतो. योग्य मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीनं तुम्ही यातून लवकर बाहेर पडू शकता. वारंवार सेक्सचा (Sex) विचार केल्यानं तुम्हाला या समस्येला सामोरं जावं लागत आहे. यामधून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होण्याआधी तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेण्याचा सल्ला मी तुम्हाला देईन. तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून तुम्हाला सेक्शुअल चॅट करण्यासाठी कुणी पार्टनर नसल्याने नैराश्य येत आहे असं दिसतं आहे. यासाठी दोन मार्गांनी तुम्ही यावर मात करू शकता. पहिला मार्ग यामधून सुटका करण्यासाठी पहिला आणि सर्वांत सुरक्षित मार्ग म्हणजे तुम्ही हस्तमैथुन (Masturbation) करू शकता. यामध्ये कोणतीही अपराधीपणाची भावना नसून तुम्हाला सेक्सची इच्छा झाल्यास तुम्ही हस्तमैथुन करून तुमची लैंगिक भावना शांत करू शकता. हे वाचा - Sexual Wellness : सेक्सशिवाय मनुष्य जगूच शकत नाही, असं काही आहे का? सेक्समध्ये केवळ दोन पार्टनर असल्यानेच लैंगिक भावना शांत होतात असं नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे सेक्शुअल चॅटसाठी व्यक्ती नसल्यास तुम्ही या मार्गाने तुमचं समाधान करून घेऊ शकता. अनेकजण असे करतात. त्याचबरोबर हा सर्वाधिक सुरक्षित मार्ग असून यामधून तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना देखील कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. दुसरा मार्ग तुम्हाला तुमची लैंगिक इच्छा (Sexual Desire) पूर्ण करायची असेल तर तुम्ही यासाठी डेटिंग ॲपचा आधार घेऊ शकता. त्याचबरोबर सेक्स चॅट करण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीला देखील अतिशय शांतपणे हे विचारू शकता. पण यासाठी कुणावरही जबरदस्ती करू नका. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्याप्रमाणे एखादी व्यक्ती सापडल्यास नक्कीच आनंद आहे. पण एखाद्याने नकार दिल्यास शांतपणे तो नकार स्वीकारा. हे वाचा -  Sexual Wellness: बाळाच्या जन्मानंतर 2-3 महिन्यांत लैंगिक संबंध ठेवणं योग्य आहे? आजकाल सेक्स्टिंग (Sexting) आणि ऑनलाईन सेक्स चॅट (Sex Chat) करणाऱ्या अनेक साईट्स उपलब्ध आहेत. या साईटवर तुमच्यासारख्या इच्छा असणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. त्यांच्याबरोबर ऑनलाईन चॅट करून तुम्ही तुमच्या भावना शांत करू शकता. Omegle सारख्या अनेक ऑनलाईन डेटिंग ॲप या सेवा पुरवते. यामध्ये तुमचे सेक्शुअल डिझायर काय आहेत हे देखील विचारलं जातं. त्यामुळे या साईटवर जाऊन तुम्ही तुमचं लैंगिक समाधान करू शकता.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual health, Sexual relationship, Sexual wellness

पुढील बातम्या