मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'जोडीदारासोबत भावनिक नातं पण सेक्ससाठी मनात दुसरीच स्त्री; हे योग्य आहे का?'

'जोडीदारासोबत भावनिक नातं पण सेक्ससाठी मनात दुसरीच स्त्री; हे योग्य आहे का?'

फोटो सौजन्य - canva

फोटो सौजन्य - canva

Sexual Wellness : तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून.

प्रश्न :  मी माझ्या जोडीदाराशी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या जोडलेला आहे परंतु लैंगिकदृष्ट्या नाही, यामुळे मी इतर स्त्रियांबरोबर घनिष्ट संबंध ठेवण्याचा विचार करण्याकडे उद्युक्त होतो. असे विचार येणं नैसर्गिक आहे की हा गैरसमज आहे ?

उत्तर : लैंगिकदृष्ट्या जवळीक असणं, सेक्सची अपेक्षा करणं अगदी नैसर्गिक आणि सामान्य बाब आहे. असे विचार आणि भावना असण्यात काहीही चूक नाही. नात्यात  परस्पर विश्वास, प्रेम आणि शारीरिक जवळीक चांगली असतानादेखील दुसऱ्या व्यक्तीबद्दल लैंगिक विचार आणि इच्छा असणं अगदी सामान्य आहे. अर्थात असे विचार किंवा इच्छा असली तरी त्या प्रत्यक्षात आणायच्या की नाही, हे तुमच्या नात्यावर आणि तुमच्या परस्परांकडून कोणत्या अपेक्षा आहेत यावर अवलंबून आहे.

तुम्ही एकनिष्ठ आणि विश्वासू असावं अशी तुमच्या जोडीदाराची अपेक्षा असेल तर अशा इच्छा प्रत्यक्षात आणणं हा तुमच्या जोडीदाराचा विश्वासघात ठरेल.  तरीही अशा परिस्थितीत  तुम्हाला आकर्षक वाटणार्‍या, आवडलेल्या इतर व्यक्तीबाबत लैंगिक विचार आणि कल्पना करणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. लैंगिक भावना या मानवाच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत. त्याबद्दल अपराधी किंवा लाज वाटण्याचे काही कारण नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे आणि तुमच्या जोडीदारामध्ये शारीरिक संबंध नाहीत, म्हणून तुमच्या मनात असे विचार येतात असा याचा अर्थ नाही. हे उलट परिस्थितीतही घडू शकते. अर्थात अशा वेळी तुम्हाला शारीरिक संबंधांबाबत निराशा वाटण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला खरंच  जोडीदाराबरोबर लैंगिक संबंध ठेवायचे असतील,  तर तुमची ही इच्छा त्यांना जरूर सांगा.

हे वाचा - 'सेक्सची इच्छा होते, प्रत्यक्षात करावासा वाटत नाही; वैवाहिक आयुष्य कसं सांभाळू?'

अनेक जोडपी अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे  हनीमूनच्या टप्प्यात उच्च दर्जाचे लैंगिकसुख मिळवत असतात. कालांतरानं मात्र कामाचा ताण, पालकत्वाची जबाबदारी, व्यस्त वेळापत्रक आणि आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित तणाव यामुळे हळूहळू शारीरिक संबधातील उत्साह कमी होतो.

तुम्ही जोडीदाराशी मानसिक आणि भावनिक पातळीवर चांगले जोडलेले आहात, ही चांगली बाब आहे. आपल्या जोडीदारापासून सेक्शुअली लांब असण्याची कारणं शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे? हा परस्पर संयम किंवा काहीतरी चुकत असण्याचा प्रकार आहे का?

लैंगिक जवळीक ही सुद्धा नात्यासारखीच असते. नात्यात जशी बांधिलकी आणि गुंतवणूक आवश्यक असते तशीच यातही ती असावी लागते. लैंगिक जवळीक ही केवळ शारीरिक संभोगाच्या कृतीपेक्षा अधिक असते.  यात मिठी मारणं, हात धरून ठेवणं आणि कोमल स्पर्श यासारख्या सर्व प्रकारच्या स्पर्शांचा समावेश असतो. शरीरसुखातून मिळणाऱ्या आनंदासाठी आवश्यक शारीरिक स्पर्शाचा हा एक टप्पा असतो. आपल्या जोडीदाराबद्दल शब्दांद्वारे प्रेम व्यक्त करणं आणि लैंगिक विषयाबद्दल बोलणं हा एक प्रकारचा फोरप्लेचा भाग आहे. त्यामुळे तुमच्यातील शारीरिक सुखाची पातळी वाढू शकते. तुमच्या बेडरूममध्ये वातावरण निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे काही संभाषणाचे नमुने इथं दिले आहेत.

"आपण जेव्हा शारीरिकदृष्ट्या एकत्र असतो तेव्हा मला तुझ्या अगदी जवळ असल्यासारखं वाटतं. आपण एकमेकांना चांगलं लैंगिक सुख देऊ शकू यासाठी काय करता येईल, याबाबत बोलू इच्छितो"

"मला तुझी ही गोष्ट फार आवडली  ....( त्यांचे केस, कपडे, शारीरिक जवळीकीची कृती, डोळे, सेंट यांचे मनापासून कौतुक करा)."

हे वाचा - SEXUAL WELLNESS : सेक्सपासून दूर राहणं चुकीचं आहे का?

बर्‍याच वेळा, आपण वीर्यस्खलन होण्याचा टप्पा गाठणं म्हणजे सेक्समधील संपूर्णता असं वाटून त्यावरच लक्ष केंद्रीत करतो. त्या नादात भावनिक आनंदाकडं दुर्लक्ष करतो. त्याऐवजी शारीरिक प्रसन्नतेवर, भावनिक आनंदावरही लक्ष केंद्रीत केल्यास दडपणमुक्त शरीरसुखाचा आनंद घेता येईल.

आपल्या जोडीदाराशी आपली भावनिक, शारीरिक गुंतवणूक चांगली असली तरीही दुसऱ्याच  व्यक्तीबद्दल असे विचार येऊ शकतात. त्यावर साथीदाराबरोबर शरीरसंबंध ठेवणं हा उपाय किंवा उपचार नाही. खरं तर अशा बाबतीत कोणताही उपाय किंवा उपचारांची आवश्यकता नाही. कारण हा काही दोष नाही, ही अगदी सामान्य बाब आहे. जोडीदारासह निरोगी लैंगिक आयुष्य असेल तर कदाचित तुम्हाला येणाऱ्या निराशेचं निराकरण करणं शक्य होईल. त्यानंतरही असे विचार येणं सुरू राहिलं तर तो तुमचा किंवा तुमच्या जोडीदाराचा किंवा तुमच्या नात्याचाही दोष नाही, हे समजून घ्या आणि स्वतःप्रती प्रेमानं वागा.

First published:
top videos

    Tags: Sexual wellness