जाहिरात
मराठी बातम्या / मनी / जगातला सर्वात श्रीमंत माणूस भारतात किराणा मालाच्या दुकानात जाऊन विकतोय सामान

जगातला सर्वात श्रीमंत माणूस भारतात किराणा मालाच्या दुकानात जाऊन विकतोय सामान

जगातला सर्वात श्रीमंत माणूस भारतात किराणा मालाच्या दुकानात जाऊन विकतोय सामान

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेजोस यांनी एका किराणा मालाच्या दुकानात जाऊन सामान विकत असल्याचा फोटो शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जानेवारी : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस सध्या भारतीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारत दौऱ्यावर आल्यानंतर अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र, याचवेळी त्यांनी ट्विटरवरून एक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते एका लहानशा दुकानातून काही सामान देताना दिसत आहेत. जेफ बेजोस यांनी हा फोटो शेअर करताना म्हटलं की, डिलिव्हरी पॉइंटसाठी भारतातील हजारो किराणा दुकानांशी अॅमेझॉनने पार्टनरशिप केली आहे. ही सुविधा ग्राहकांसाठी चांगली असून दुकानदारांनाही पैसे कमावण्याची संधी मिळत आहे.

जाहिरात

भारत दौऱ्यावर आल्यानंतर जेफ बेजोस यांनी म्हटलं की, 21 वं शतक हे भारताचं असेल. नवी दिल्लीत त्यांनी अॅमेझॉन 2024 पर्यंत भारतात उद्योगामध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल असं जाहीर केलं होतं. ATM मधून पैसे काढताना या लाइटवर ठेवा लक्ष, नाहीतर रिकामं होईल तुमचं बँक खातं याशिवाय भारतात 2025 पर्यंत 10 लाख लोकांना नोकऱ्या देऊ असंही जेफ बेजोस यांनी म्हटलं होतं. इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी आणि लॉजिस्टिक्समध्ये गुंतवणूक करून नवीन नोकऱ्या निर्माण करणार आहे. पुढच्या 5 वर्षात भारतात 10 लाख नोकऱ्या द्यायच्या आहेत असंही ते म्हणाले होते. जगातला हा सर्वात श्रीमंत माणूस भारतात गुंतवणार 7 हजार कोटी रुपये

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात