VIDEO: 'लाज वाटली पाहिजे' छपाक लूकवर दीपिकाने दिलं TikTok चॅलेंज

VIDEO: 'लाज वाटली पाहिजे' छपाक लूकवर दीपिकाने दिलं TikTok चॅलेंज

या व्हिडिओमध्ये दीपिका फाबीला तिच्या 3 आवडीच्या चित्रपटांमधील लुक्स रिक्रिएट करण्याचं चॅलेंज दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी: अभिनेत्री दिपाका पदुकोणवर सध्या अनेकजण नाराज आहेत. तिचा एक टिकटॉक व्हिडिओ याला कारण ठरला आहे. दीपिकाने एक टिकटॉक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये ती छपाक या तिच्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. पण ज्या पद्धतीने तिने चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी हा टिकटॉक व्हिडिओ शूट केला त्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. टिकटॉक स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाबीसोबत तिने हा व्हिडिओ बनवला आहे.

या व्हिडिओमध्ये दीपिका फाबीला तिच्या 3 आवडीच्या चित्रपटांमधील लुक्स रिक्रिएट करण्याचं चॅलेंज दिलं आहे. ओम-शांती-ओम चित्रपटातील शांती, पीकू चित्रपटातील पीकू आणि छपाकमधील मालती हे तीन लूक करण्याचं तिनं चॅलेंज दिलं आहे. फाबीनेही दीपिकाचं हे चॅलेंज स्वीकारत पुर्ण केलं आहे. मात्र हा व्हिडीओ दीपिकाच्या चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही.

सोशल मिडीयावरून दीपिकाला सुनावलं

दीपिकाने ट्विटरवर हा टिकटॉक व्हिडिओ शेअर केल्यावर अनेकांनी यावरून तिला सुनावलं आहे. दीपिकाने केलेला हा व्हिडिओ अत्यंत निंदणीय असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. टिकटॉक व्हिडिओमध्ये दीपिकाने फाबीला छपाक चित्रपटातील मालती या भुमीकेचं लूक कॉपी करण्याचं चॅलेंज दिलं जे फाबीने पुर्ण केलं. दीपिकाने असं करायला नको होतं असं म्हणत हा पब्लिसिटी स्टंट खूप वाईट होता अशा प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या आहेत.

अशाप्रकारे एखाद्या अटॅक विक्टिमवर TikTok चॅलेंज देणं हे खूप वाईट आहे. अॅसिड हल्ल्यात मुळ रूप गमावलेल्या आणि त्या जळलेल्या खूणा घेवून जगणाऱ्या व्यक्तीच्या लूकला कोणी TikTok चॅलेंज म्हणून देवू शकत नाही. 'दीपिका पदूकोणने केलेलं हे आत्तापर्यंतच सर्वांत खराब प्रमोशन आहे. दीपिका तुला लाज वाटली पाहिजे' अशा शब्दांमध्ये तिच्यावर आगपाखड होत आहे.

First published: January 19, 2020, 8:54 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading