एडनबर्ग, 13 मे: कनेक्शन तुटल्यामुळे किंवा इलेक्ट्रीकल पोलमध्ये बिघाड झाल्यामुळे बऱ्याचदा वीज पुरवठा खंडित झाल्याचं ऐकलं आहे. पण एका बैलानंच अख्ख्या 700 घरांचा वीज पुरवठा बंद केल्याचा अजब प्रकार घडला आहे. स्कॉटलंड इथल्या एका शहरात बैलामुळे मोठा गोंधळ उडाला होता. बैलाच्या मालकानं यासंर्भात फेसबुक पोस्ट लिहून सोशल मीडियावर माफी मागितली आहे. रॉन नावाचा बैलामुळे तब्बल 700 घरांना वीजेपासून वंचित रहावं लागलं आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
हेजल लोफ्टन यांनी आपल्या बैलानं केलेल्या कृतीवर माफी मागितली आहे. ते असं म्हणतात की बैलाच्या पाठिवर खूप खाज येत होती. त्यामुळे त्याला खाजवायला साधन सापडत नव्हतं. शेजारी वीजेचा पोल त्याला दिसला आणि त्यानं त्या खांबाला पाठ जोरात घासण्यास सुरुवात केली. त्याच्या पाठ घासण्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा बॉक्स खाली कोसळला आणि वीज पुरवठा खंडित झाला.
हे वाचा-VIDEO : थांबला तो संपला! या युवकाच्या जिद्दीसमोर हरण्याचं दु:खही विसरून जाल
रॉन म्हणाले की 11000 वोल्टचा वीज प्रवाह असलेल्या खांबाला त्यांनं पाठ घासली आणि ट्रान्सफॉर्मर खाली कोसळला. बैलाचा सुदैवानं यामध्ये जीव वाचाल्यामुळे मी खूप आनंद आहे. बैलाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या बैलाचं नाव रॉन बदलून स्पार्की ठेवायला हवं असंही ते म्हणाले.
त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत. या बैलानं केलेल्या करामतीमुळे चॅपल्टन आणि स्ट्रीट हेवनमधील सुमारे 800 घरांमध्ये गुरुवारी वीज पुरवठा खंडित झाला होता. माहिती मिळताच अभियंत्यांची एक टीम घटनास्थळी आली आणि बैल रॉनला सुरक्षितपणे दुसर्या ठिकाणी नेले. पर्यायी जनरेटरमार्फत रात्री संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे.
हे वाचा-Lockdown मध्ये कपालभाती करणारी ही खार झाली स्टार, पाहा VIDEO
संपादन- क्रांती कानेटकर