मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

संभाजीराजे म्हणाले, मी आधी समाजाचा योद्धा, त्यांचे प्रश्न सुटले तर कोरोना योद्धा बनेल, अन्यथा..

संभाजीराजे म्हणाले, मी आधी समाजाचा योद्धा, त्यांचे प्रश्न सुटले तर कोरोना योद्धा बनेल, अन्यथा..

एकीकडे सर्व राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, आंदोलन होत असताना मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याने संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली

एकीकडे सर्व राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, आंदोलन होत असताना मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याने संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली

Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation सरकारनं 6 जूनपूर्वी मराठा समाजाचे पाच प्रश्न सोडवावे. अन्यथा मी सुरुवातीपासून समाजाचा योद्धा आहे, हे विसरू नका असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

  • Published by:  News18 Desk
सिंधुदुर्ग, 31 मे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून संभीजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महाविकास आघाडी सरकारनं (MVA) 6 जूनपूर्वी मराठा समाजाचे पाच प्रश्न सोडवावे. तसं केल्यास उद्धव ठाकरे  यांनी केलेल्या आवाहनानुसार मी कोरोना योद्धा बनून बाहेर पडले. अन्यथा मी सुरुवातीपासून समाजाचा योद्धा आहे, हे विसरू नका असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. (वाचा-15 जूनर्यंत कसा असेल लॉकडाऊन? तुमच्या मनातील प्रश्न आणि शासनाने दिली उत्तरं) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर आंदोलनासाठी निघालेल्या छत्रपती संभाजीराजे यानी सोमवारी सिंधुदुर्ग दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला असेल. पण 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचा मराठा समाजाच्या विरोधात निकाल आला त्यावेळीच महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना शांत राहण्याचं आवाहन मी केलं. त्यामुळं मराठा बांधवांच्या भावनांचा उद्रेक झाला नाही, हेही मुख्यमंत्र्यांना माहिती असेल. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी कौतुकही केलं होतं, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. (वाचा-भारताच्या नव्या IT नियमांसाठी Facebook,Google सज्ज!वेबसाईट अपडेट करण्यास सुरुवात) मुख्यमंत्र्यांनी मला कोरोनाचा योद्धा होऊन बाहेर पडावं असा सल्ला आहे. पण मी सुरुवातीपासूनच समाजाचा योद्धा आहे. कोरोनाचा योद्धा बनून मी बाहेर पडाव असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर समाजाचे पाच प्रश्न मी मांडले आहेत. ते त्यांनी 6 जूनला मी भूमिका घेण्यापूर्वी मार्गी लावावेत असं अल्टीमेटम खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे देखील या प्रश्नातून मार्ग काढतील असा मला विश्वास आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. समाजाला न्याय देण्याची भूमिका या सरकारने घ्यावी. मराठा समाजाच्या प्रश्नामध्ये राजकारण आणू नये अशी माझी प्रामाणिक भूमिका असल्याचंही यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
First published:

Tags: Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati

पुढील बातम्या