अखेर सलमान कतरिनाला म्हणाला, ‘बन जा मेरे इश्क की चाशनी’

बॉलिवूडच्या 'दबंग' खानने भारत सिनेमातील एका रोमँटिक गाण्याचा टीझर आज सोशल मीडियावर शेअर केला. या गाण्यात सलमान आणि कतरिनाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 09:20 PM IST

अखेर सलमान कतरिनाला म्हणाला, ‘बन जा मेरे इश्क की चाशनी’

मुंबई, ३० एप्रिल- बॉलिवूडच्या दबंग खानने भारत सिनेमातील एका रोमँटिक गाण्याचा टीझर आज सोशल मीडियावर शेअर केला. या गाण्यात सलमान आणि कतरिनाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. ‘इश्क दी चाशनी’ असं या गाण्याचं नाव असून ह टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल झाला. गाण्यात सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री जेवढी सुंदर वाटते तेवढेच सुंदर या गाण्याचे बोल आणि संगीत आहे. गाण्याचा हा टीझर पाहिल्यानंतर आता सलमानच्या प्रेक्षकांना पूर्ण गाणं कधी येतं याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Hook Up Song : आलिया- टायगरचा पोल डान्स व्हिडिओ व्हायरल

भारत सिनेमा यावर्षी ईदला अर्थात 5 जूनला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान २२ वर्षाच्या मुलापासून ते ७२ वर्षाच्या वयोवृद्ध माणलापर्यंतची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात सलमानचे सगळेच लुक दाखवण्यात आले आहेत.


३ मिनिट ११ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सिनेमा नक्की काय असणार आहे ते स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासून सलमानची गोष्ट सुरू होते. सलमान सर्कसमध्ये ‘मौत का कुआ’त बाइक चालवताना दिसतो. दिशा पटानीही सर्कसमध्ये त्याच्यासोबत काम करताना दाखवण्यात आली आहे. यानंतर तो दुसरी नोकरी करण्यासाठी सरकारी कार्यालयात जातो. इथे त्याची ओळख कतरिना कैफशी होते. इथे त्याला काम मिळतं. याचदरम्यान एक अशी घटना होते ज्यात सलमान भूतकाळात जातो.

Loading...

रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’

या फ्लॅशबॅकमध्ये जॅकी श्रॉफ दिसतो. जॅकीने सिनेमात सलमानच्या वडिलांची भूमिका केली आहे. यानंतर सलमान मर्चंट नेवीच्या ड्रेसमध्ये दिसतो. शेवटी वाघा बॉर्डवरवरचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनचा फोटो सलमानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

कॅन्सर फ्री झाले ऋषी कपूर? भाऊ रणधीर कपूर यांनी केला खुलासा

सलमान खानचा हा सिनेमा यावर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास दिग्दर्शित या सिनेमात कतरिना कैफ, सलमान खान, सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 09:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...