Hook Up Song : आलिया- टायगरचा पोल डान्स व्हिडिओ व्हायरल

Hook Up Song : आलिया- टायगरचा पोल डान्स व्हिडिओ व्हायरल

टायगर आलियाची जबरदस्त केमिस्ट्री असलेल्या हुकअप साँगचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : सध्या बॉलिवूडमध्ये एकामगोमाग एक सिनेमा रिलीज होण्याच्या चर्चा आहेत. पण सर्वाधिक चर्चा होते आहे ती, अनन्या पांडे, तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ यांच्या 'स्टुडंट ऑफ द इअर 2'ची. नुकतंच या सिनेमातील बहुचर्चित 'हुकअप' साँग रिलीज झालं असून प्रेक्षकांचा या गाण्याचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हे या सिनेमातील तिसरं गाणं असून यात अभिनेत्री आलिया भट आणि टायगर श्रॉफची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

This one got me hooked! The song and this hashtag - #Talia! #HookUpSong #SOTY2

A post shared by Alia (@aliaabhatt) on

वाचा : रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’

'हुकअप' साँगमध्ये आलिया भट पहिल्यांदा पोल डान्स करताना तर टायगर श्रॉफ शर्टलेस दिसत आहे. टायगर आलियाची जबरदस्त केमिस्ट्री असलेल्या या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पण या गाण्यातून सिनेमातील बाकी दोन अभिनेत्री मात्र गायब आहेत. याआधी 'स्टुडंट ऑफ द इअर 2'मधील 'द जवानी सॉन्ग' आणि 'मुंबई दिल्ली दियां कुडियां' ही दोन गाणी रिलीज झाली असून आता रिलीज झालेल्या 'हुकअप साँग'मधून आलिया भटनं पाहुणी कलाकार म्हणून सिनेमात जबरदस्त एंट्री केली आहे. पण सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन या सिनेमात हजेरी लावणार का हे अद्याप समजलेलं नाही.

वाचा : ...आणि नॅशनल टेलिव्हिजनवर पाकिस्तानी अभिनेता अली जफर ढसाढसा रडला

'स्टुडंट ऑफ द इअर 2'मधून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर 12 एप्रिलला रिलीज झाला असून यावर नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. या सिनेमातून टायगर श्रॉफला पहिल्यांदा करण जोहर सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. याआधी 2012मध्ये रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इअर'मधून अलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि आता हे तिघंही बॉलिवूडमधील यशस्वी कलाकार आहेत.

वाचा : बापरे! एका मतदानासाठी भूमी पेडणेकरने चक्क एवढ्या तासांचा प्रवास केला

First published: April 30, 2019, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading