मुंबई : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारीखला काही नियम बदलतात. नव्या वर्षातील दुसरा महिना फेब्रुवारी या महिन्याच्या एक तारीखला अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. बजेटच्या दिवशी कोणते बदल होणार आणि तुमच्या खिशाला किती कात्री ते समजून घ्या. यातील काही नियम तर थेट तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारे आहेत.
1 फेब्रुवारी 2023 पासून पैशांशी संबंधित अनेक नियमांमध्ये अनेक बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार आपला शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. अशा परिस्थितीत जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचबरोबर बँकेशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत.
सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संपूर्ण देश याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय अर्थसंकल्पात अपेक्षित आहेत.
क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यावर लागणार चार्ज
क्रेडिट कार्डने भाडे भरणे महागात पडणार आहे. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डधारकांना मोठा धक्का बसला आहे. क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास 1 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा कंपनीने केली आहे. हा नियम 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहे.
LPG चे दर वाढणार
दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या दिवशी वाढ आणि कपातीचा समावेश आहे. त्यामुळे किमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमतीत 1.2 टक्क्यांपर्यंत वाढ केली
टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढवलेले दर 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मॉडेल आणि व्हेरियंटनुसार पेट्रोल, डिझेल इंजिन प्रवासी वाहनांच्या किंमतीत सरासरी 1.2 टक्क्यांनी वाढ होईल.
Budget 2023: गरीबांना मोदी सरकार देणार मोठी भेट! 40,000 कोटी खर्चाची तयारी
Noida मध्ये गाडी चालवताना सावधान
स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत परिवहन विभागाने आता गौतमबुद्ध नगरमध्येही कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आता 1 फेब्रुवारी 2023 पासून नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये 15 वर्षे जुनी पेट्रोल आणि 10 वर्षे जुनी डिझेल वाहने जप्त आणि स्क्रॅप केली जातील.
यापूर्वी एनजीटीच्या आदेशानुसार परिवहन विभागाने मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलवाहनांची नोंदणी रद्द केली होती. आता ही वाहने पकडून जप्त केली जाणार आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या स्क्रॅपेज पॉलिसीमध्ये लोकांनी रस न दाखवल्याने परिवहन विभागाने ही कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Credit card, Credit card statements, Money