मुंबई, 28 जानेवारी: अवघ्या काही दिवसांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
या बजेटमध्ये सरकार प्रधानमंत्री आवास योजनेविषयी मोठी घोषणा करु शकते असे मानले जातेय. शहरी आणि ग्रामीण दोन्हींनाही याचा मोठा फायदा होऊ शकतो.
या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, सरकार दोन्ही गृहनिर्माण योजनांमध्ये मोठी तरतूद करू शकते. सीएनबीसी-आवाजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार 2024 पर्यंत ग्रामीण भागात सुमारे 84 लाख घरांचे लक्ष्य ठेवणारेय.
या योजनेवर सरकार बंपर खर्च करणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी 40 हजार कोटींहून अधिक बजेट असण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या विशेष माहितीनुसार, अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजनेला मोठी चालना मिळू शकते.
प्रधानमंत्री आवास योजना 25 जून 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. ही भारत सरकारची एक योजना आहे ज्याचा उद्देश प्रत्येक गरिबांना कमी खर्चात घरे उपलब्ध करून देणे आहे.