मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /वन-डे क्रिकेटमधील सर्वात थरारक मॅचची तुमची आठवण काय? पाहा कधीही न विसरणारा VIDEO

वन-डे क्रिकेटमधील सर्वात थरारक मॅचची तुमची आठवण काय? पाहा कधीही न विसरणारा VIDEO

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs Soutth Africa) यांच्यात 1999 साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलला आज 22 वर्ष झाली आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs Soutth Africa) यांच्यात 1999 साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलला आज 22 वर्ष झाली आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs Soutth Africa) यांच्यात 1999 साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलला आज 22 वर्ष झाली आहेत.

मुंबई, 17 जून : क्रिकेट इतिहासातील ही मॅच या अजरामर आहे. ही मॅच होऊन आज 17 जून रोजी 22 वर्ष झाली. दोन दशकांनंतरही ती मॅच पाहिलेला कुणीही ती विसरु शकत नाही. दोन बलाढ्य टीममधील ती मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगली. शेवटच्या ओव्हरमध्ये झालेल्या थरारनाट्यामुळे अनेकांचा काळजाचा ठोका चुकला. त्या मॅचमध्ये टीम इंडिया नव्हती. पण, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच देशभर पाहिली गेली. त्या मॅचमधली गडबड टळली असती तर बरं झालं असतं, असं आजही 22 वर्षांनंतरही अनेकांना वाटतं. प्रत्येकाची  त्या मॅचशी संबंधित एक आठवण आहे. ती आठवण  ती व्यक्ती शेवटपर्यंत जपणार आहे.

होय. आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs Soutth Africa) यांच्यात 1999 साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलबद्दल बोलत आहोत. ऑस्ट्रेलियाने 1999 चा वर्ल्ड कप जिंकला. पण आजही त्या वर्ल्ड कप फायनलपेक्षा सेमी फायनलची चर्चा जास्त होते.

सुपर सिक्समध्ये केला होता पराभव

ऑस्ट्रेलियाची टीम 1999 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या अगदी उंबरठ्यावर होती. सुपर सिक्समध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये हर्षल गिब्जनं स्टीव्ह वॉचा कॅच सोडत कांगारुंना जीवदान दिले. या जीवदानाचा फायदा घेत स्टीव्ह वॉ ने 120 रनची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियानं ती मॅच दोन बॉल आणि पाच विकेट्स राखून जिंकली. त्यानंतर पुन्हा एकदा सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ आमने-सामने होते.

डोनाल्ड - पोलॉकचा भेदक मारा

पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मार्क वॉला पहिल्याच ओव्हरमध्ये पोलाकनं आऊट केले. दुसऱ्या विकेटसाठी गिलख्रिस्ट आणि पॉन्टिंग यांनी 51 रनची पार्टरनरशिप केली. मात्र डोनाल्डनं एकाच ओव्हरमध्ये पॉन्टिंग (37) आणि लेहमन (1) यांना आऊट करत ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर ढकलले. त्यानंतर जॅक कॅलिसनं गिलख्रिटचा (20) अडथळा दूर केला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 4 आऊट 68 होता.

स्टीव्ह वॉ तारणहार

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह वॉ पुन्हा एकदा टीमचा तारणहार ठरला. वॉने 56 रनची खेळी केली. त्याने मायकल बेवन सोबत 90 रनची भागिदारी केली. बेवननं 65 रन काढले. तो ऑस्ट्रेलियाकडून आऊट झालेला शेवटचा बॅट्समन होता. दक्षिण आफ्रिकेकडून पोलॉकनं पाच तर डोनाल्डनं 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम 49.2 ओव्हर्समध्ये 213 रनवर ऑल आऊट झाली.

शेन वॉर्नची जादू

दक्षिण आफ्रिकेकडून गिब्ज आणि कस्टर्न  जोडीनं पहिल्या विकेटसाठी 48 रनची पार्टरनरशिप केली. शेन वॉर्ननं फक्त 8 बॉलमध्ये गिब्ज (30) आणि कस्टर्न (18) आऊट करत ऑस्ट्रेलियाला पुन्हा मॅचमध्ये आणले. वॉर्ननेच कॅप्टन हॅन्सी क्रोनिएला शून्यावर आऊट केले. जॅक कॅलिस आणि जॉन्टी ऱ्होडसनं 5 विकेट्ससाठी 83 रनची भागिदारी केली. वॉर्नने कॅलिसला आऊट करत ही जोडी फोडली. कॅलिस आऊट झाला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला मॅच जिंकण्यासाठी 31 बॉलमध्ये 39 रन हवे होते आणि त्यांच्या 4 विकेट्स बाकी होत्या.

WTC Final : टीम इंडियाच्या Playing XI बद्दल सचिनचा सल्ला, म्हणाला...

क्लुसनरची आक्रमक खेळ

लान्स क्लुसनर वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात होता.दक्षिण आफ्रिकेची भिस्त आता क्लुसनरवर होती. आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 9 रन हवे होते.  क्लुसनरनं डेमियन फ्लेमिंगच्या पहिल्या दोन बॉलवर दोन फोर लगावले. मॅच टाय झाली. आता दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये फक्त 1 रन हवा होता आणि क्लुसनरकडे स्ट्राईक होती.

क्लुसनरनं तिसऱ्या बॉलवर जोरदार फटका मारला, पण तो सरळ लेहमनच्या हातामध्ये गेला. त्यावेळी नॉन स्ट्रायकर एंडला असलेला डोनाल्ड रन आऊट होता होता वाचला. त्यानंतर चौथा बॉल क्लुसनरनं सरळ मारला आणि तो रन काढण्यासाठी पळाला. नॉन स्ट्रायकरला असलेला डोनाल्ड तो बॉल पाहत उभा राहिला. क्लुसनर वेगानं पळत नॉन स्ट्रईकच्या दिशेने गेला. डोनाल्ड रन काढण्यासाठी पळाला. पण तो पर्यंत उशीर झाला होता. डोनाल्ड रन आऊट झाला.

" isDesktop="true" id="566207" >

ऑस्ट्रेलियानं उत्तम रनरेटच्या आधारावर फायनलमध्ये प्रवेश केला. 10 ओव्हरमध्ये 29 रन काढून 4 विकेट्स काढणारा शेन वॉर्न मॅन ऑफ द मॅच ठरला.

First published:

Tags: Australia, On this Day, South africa