मराठी बातम्या /बातम्या /विदेश /BREAKING : ऑक्सफर्डच्या COVID-19 लशीसंदर्भात उद्या येऊ शकते Good News

BREAKING : ऑक्सफर्डच्या COVID-19 लशीसंदर्भात उद्या येऊ शकते Good News

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोना लसीची मोठी गरज निर्माण झाली आहे

लंडन, 15 जुलै : Coronavirus साथीच्या काळातली सगळ्यात मोठी चांगली बातमी कदाचित उद्या मिळू शकते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार करत असलेल्या COVID-19 लशीविषयी चांगली बातमी उद्या मिळेल असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

या लशीची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. तिसऱ्या फेजमधल्या मानवी चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचे निकाल AstraZeneca कंपनी उद्या जाहीर करू शकते. ऑक्सफर्ड तयार करत असलेल्या लशीचे अधिकार या कंपनीकडे आहेत. भारतात सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डच्या लशीसंदर्भात करार केला आहे. या लशीची चाचणी यशस्वी झाली आणि याच्या उत्पादनाला परवानगी मिळाली तर भारतातही ही लस लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकते.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने सीरम इन्स्टिट्युटनेही कोरोनाव्हायरसविरोधातील लस विकसित केली आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार करत असलेल्या लशीत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची (Serum Institute of India) भागीदारी आहे. या इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं की ऑक्सफर्डची लस यायला अजून सहा महिने लागतील.

भारतीय लशीची मानवी चाचणी सुरू

भारतीय औषधी कंपनी जायदस कॅडिलाने (Zydus Cadilla) बुधवारी सांगितले की त्यांनी संभाव्य कोरोना लशीची मानवी चाचणी (Human Trial) सुरू केल्या आहेत. कंपनीने सांगितले आहे की, ZYCoV-D ही लस प्लाझ्मिड डीएनए लस, प्री-क्लिनिकल टॉक्सिसिटी अभ्यासामध्ये सुरक्षित मानली गेली आहे. यापूर्वी, या कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रतिकारशक्ती आणि प्रतिकारशक्ती चाचण्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

अमेरिकन लशीची पहिलं ह्युमन ट्रायल यशस्वी

मॉडर्ना (Moderna) या अमेरिकन कंपनीच्या लशीनं पहिली चाचणी यशस्वी पार केली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले परिणाम दिसून आले. मोडर्नाच्या लसविषयी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे याचे कोणत्याही रुग्णांवर साइट इफेक्ट दिसून आले नाही आहेत.

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Oxford