मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बाबो! तो सुट्टीवरून परतला, पाहतो तर काय? अख्खं घरच्या घरच गायब  

बाबो! तो सुट्टीवरून परतला, पाहतो तर काय? अख्खं घरच्या घरच गायब  

घराला कुलूप लावून सुट्टीवर गेलेला घरमालक जेव्हा परत आला, तेव्हा त्याचं घरच (Residential home got vanished when owner came back from holiday) गायब असल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

लंडन, 2 नोव्हेंबर: घराला कुलूप लावून सुट्टीवर गेलेला घरमालक जेव्हा परत आला, तेव्हा त्याचं घरच (Residential home got vanished when owner came back from holiday) गायब असल्याची घटना समोर आली आहे. प्रत्येकाला आपलं घर प्रिय असतं. बहतेक सर्वसामान्य (All lifetime investment in home) माणसं आपली आयुष्यभराची पुंजी खर्च करून घर घेत असतात. मात्र अचानक हे घर गायब झालं तर? असंच घडलंय इंग्लंडमधील ल्यूटनेच्या एका रहिवाशाबाबत. हा रहिवासी जेव्हा सुट्टीवरून परत आला, तेव्हा त्याचं घऱ गायब असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिथे चोरी झाली नव्हती किंवा दरोडाही पडला नव्हता. तर चक्क त्याच्या नावावर असणारं घरच गायब झालं होतं.

काय आहे प्रकार?

इंग्लंडमधील ल्यूटेन्समध्ये राहणारे माईक हॉल हे पेशानं एका चर्चचे पादरी आहेत. काही कामानिमित्त सुट्टी घेऊन ते नॉर्थ वेल्सला गेले होते. काम संपल्यावर ते परत आपल्या घरी आले. मात्र तिथली परिस्थिती पाहून त्यांना जबर धक्का बसला. कारण त्यांचं घर ते आता त्यांचं घर राहिलं नव्हतं. जेव्हा त्यांनी घराचा दरवाजा चावीने उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो उघडला नाही. कुलुपात काहीतरी बिघाड झाला असावा, असं त्यांना सुरुवातीला वाटलं. मात्र जेव्हा त्यांना सत्य समजलं, तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

परस्पर विकलं घर

माईक यांनी डोअर बेल वाजवल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीचं दार उघडलं. आपल्या घरात आगंतुक व्यक्ती असून तिने दार उघडल्याचं पाहून माईक यांना धक्का बसलाच, मात्र वस्तुस्थिती समजल्यावर त्यातून जबर धक्का बसला. या घराचा विक्री व्यवहार झाला असून आपणे हे घर विकत घेतल्याचं घरातील व्यक्तीनं सांगितलं.

हे वाचा- सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, दिला भावनिक संदेश

पोलिसांना पाचारण

या घटनेमुळे वैतागलेल्या माईक यांनी पोलिसांनी फोन केला आणि घटनास्थळी बोलावून घेतलं. पोलिसांनी कागदपत्रं तपासली आणि माईक यांनाच तिथून निघून जायला सांगितलं. व्यवहार धक्कादायक आणि फसवा होता, मात्र कागदोपत्री कायदेशीर असल्याचं दिसून आलं. हा व्यवहार नेमका झालाच कसा, असा प्रश्न माईक यांना पडला असून ते याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

First published:

Tags: Britain, Police, Theft