मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Reliance चा Oxygen पुरवठ्याचा 'भीम' पराक्रम, देशात 10 पैकी एका रुग्णाला पुरवत आहेत 'प्राणवायू'

Reliance चा Oxygen पुरवठ्याचा 'भीम' पराक्रम, देशात 10 पैकी एका रुग्णाला पुरवत आहेत 'प्राणवायू'

रिलायन्सनं कोरोनाच्या महामारीमध्ये जवळपास 55 हजार मेट्रिक टनपेक्षाही अधिक ऑक्सिजनचा पुरवठा देशातील रुग्णांना केला आहे.

रिलायन्सनं कोरोनाच्या महामारीमध्ये जवळपास 55 हजार मेट्रिक टनपेक्षाही अधिक ऑक्सिजनचा पुरवठा देशातील रुग्णांना केला आहे.

रिलायन्सनं कोरोनाच्या महामारीमध्ये जवळपास 55 हजार मेट्रिक टनपेक्षाही अधिक ऑक्सिजनचा पुरवठा देशातील रुग्णांना केला आहे.

मुंबई, 1 मे : कोरोनाच्या संकटामध्ये (Corona Pandemic) विशेषतः दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन (oxygen) हे या लढ्यातलं अत्यंत महत्त्वाचं शस्त्र बनलं. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येनं ऑक्सिजनचा तुटवडा झाला. पण अशावेळी देशातील उद्योजकांनी पुढाकार घेत हे संकट दूर करण्यासाठी सरसावले. त्यात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries Mukesh Ambani) मोठा वाटा आहे. रिलायन्सनं युद्धपातळीवर तयारी करत ऑक्सिजनचा पुरवठा (Oxygen supply) वाढवला. सुप्रीम कोर्टानंही रिलायन्सच्या या कार्याचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे सध्या देशात पुरवल्या जाणाऱ्या एकूण लिक्विड ऑक्सिजनपैकी 11 टक्के ऑक्सिजन रिलायन्स उत्पादन करत आहे. म्हणजे 10 पैकी एका रुग्णाला मिळणारा ऑक्सिजन रिलायन्सनं तयार केलेला आहे. (1 out of 10 patient getting oxygen by reliance)

रोज 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती

देशात सध्या कोरोनाच्या सर्वाधिक गंभीर रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते लिक्विड ऑक्सिजन. या ऑक्सिजनची निर्मिती हे रिलायन्सचे मुख्य काम नाही. मात्र तरीही यात रिलायन्सनं अत्यंत वेगानं पुढाकार घेत मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती सुरू केली. आज रिलायन्स प्रमुख ऑक्सिजन पुरवठादार बनलं आहे. केवळ जामनगर येथील रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्पाद्वारेच रिलायन्स रोज 1000 मेट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजनचे उत्पादन करत आहे. हे उत्पादन देशाच्या एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या 11 टक्के आहे. म्हणजेच जवळपास प्रत्येक दहा रुग्णांपैकी एकाला रिलायन्सतर्फे उत्पादन केलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.

(वाचा-Oxygen Crisis : ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात डॉक्टरसहित 8 रुग्णांचा मृत्यू)

एप्रिल महिन्यात 15 लाख रुग्णांना फायदा

रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वामध्ये जामनगर येथील या प्रकल्पामध्ये ही ऑक्सिजननिर्मिती केली जात आहे. एका रात्रीत याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्याचा निर्णय रिलायन्सनं घेतला. आता रोज सरासरी एक लाख लोकांना या ऑक्सिजनमुळं फायदा होत आहे. तर एकट्या एप्रिल महिन्यामध्ये रिलायन्सनं 15 हजार मेट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन पुरवठा केला आहे. तो पूर्णपणे मोफत. याचा जवळपास 15 लाखांवर रुग्णांना फायदा झाला.

(वाचा-'या' गोळ्या ऑक्सिजन लेवल वाढतात; व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये किती तथ्य?)

24 कंटेनर केले एअरलिफ्ट

याचबरोबर रिलायन्स समुहातर्फे 24 कंटेनरही एअरलिफ्ट करून मागवण्यात आले होते. ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी हे कंटेनर मागवले. त्यामुळं जवळपास 500 मेट्रिक टन एवढी ऑक्सिजन वाहतूक क्षमता वाढली. मार्च 2020 मध्ये कोरोनाची महामारी सुरू झाली तेव्हापासून रिलायन्सनं आतापर्यंत 55 हजार मेट्रिक टनपेक्षाही अधिक ऑक्सिजनचा देशभरात पुरवठा केला आहे.

रिलायन्स समुहासाठी देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यासाठी लगेच ऑक्सिजन उत्पादन वाढवणं गरजेचं होतं आणि तेच केल्याचं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. तर रिलायन्स फाऊंडेशनच्या फाऊंडर नीता अंबानी यांनीही देशातील नागरिकांसाठी शक्य ते सर्व करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Mukesh ambani, Oxygen supply, Reliance