नवी दिल्ली, 01 मे : देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसह ऑक्सिजन तुटवड्याचं (Oxygen Crisis) संकटही वाढत चाललं आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतो आहे. दिल्लीतील एकाच रुग्णालयात ऑक्सिजनअभावी (No oxygen in hospital) तब्बल 8 जणांचा जीव गेला आहे. यामध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे. रुग्णालयाने दिल्ली हायकोर्टात ही माहिती दिली आहे.
कोरोनाच्या सध्याच्या एकंदर परिस्थितीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी बत्रा रुग्णालय प्रशासनाने (Delhi Batra hospital oxygen shortage) त्यांच्या रुग्णालयातील परिस्थिती गंभीर आहे, हे सांगितलं. ऑक्सिजनचं संकट वाढलं आहे. ज्यामुळे आठ जणांचा जीव गेला आहे. यात एका डॉक्टरचाही समावेश आहे (8 patients died including doctor due to oxygen shortage), असं बत्रा हॉस्पिटलने कोर्टात सांगतिलं.
हे वाचा - कोरोना वॉर्डच रुग्णांना देणार प्राणवायू; स्वतः तयार करणार ऑक्सिजन
कोर्टाने दिल्ली सरकारला ऑक्सिजन, मेडिसीन आणि बेड उपलब्धतेबाबत अनेक प्रश्न विचारले. संकटात सरकार लष्कराची मदत का घेत नाही आहे, अशी विचारणा कोर्टाने केली. आर्मीकडे त्यांची संसाधनं असतील. आपली सेना निश्चितच ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी दुसरा चांगला पर्यायी मार्ग देऊ शकतात. आम्ही तीन दिवसांपासून त्यांची मदत घ्या म्हणून सांगत आहोत. पण तुम्ही संकोच का करत आहात. विना ऑक्सिजन बेड्सचा फायदा नाही, असं सांगण्याऐवीज सैन्याची मदत घेण्याचा विचार करावा, असं कोर्टाने सांगितलं.
हे वाचा - 'या' गोळ्या ऑक्सिजन लेवल वाढतात; व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये किती तथ्य?
दिल्ली सरकारच्या वकिलांनी कोर्टाला उत्तर देताना सांगितलं, आमची मदत ककण्यासाठी तयार असलेल्या प्रत्येकाकडून आम्ही मदत घेऊ. लष्कराकडून मदत घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर विचार केले जात आहेत. त्यावेळी कोर्टाने विचार करण्याऐवजी थेट मदत मागण्यास सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Coronavirus, Delhi, Oxygen supply