मुंबई, 1 मे: संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर (Coronavirus second wave) पहायला मिळत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. अशा या संकट काळात इतर ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याच दरम्यान सोशल मीडियात (Social Media) असा एक मेसेज व्हायरल (Viral message) होत आहे ज्यात दावा करण्यात आला आहे की, हे औषध घेतल्यास ऑक्सिजन लेवल वाढेल.
काय आहे सोशल मीडियात व्हायरल होणारा मेसेज
सोशल मीडियात व्हायल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, "ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे? मग ऑक्सिजन मिळण्याची वाट पाहू नका. त्रिलोक्यचिन्तामणी रस 1-1 गोळी दिवसातून 3 वेळा घेतल्यास ऑक्सिजन लेवल तात्काळ सुस्थितीत येईल. हे एक आयुर्वैदिक औषध आहे. ऑक्सिजन शोधण्यात वेळ वाया घालवू नका".
व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये किती तथ्य
आयुष मंत्रालय ऐसी असत्यापित स्त्रोंतों द्वारा प्रकाशित किसी भी विज्ञापन का समर्थन नही करता है। कृपा करके गंभीर हालातों में स्वयं दवा का इस्तेमाल न करें। केवल चिकित्सक की सलाह से ही दवा लें। #AyushFactCheck
— Ministry of Ayush (@moayush) May 1, 2021
सोशल मीडियात Viral होणारा हा मेसेज Fake; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
आयुष मंत्रालयाने या मेसेजचा फोटो ट्विट करुन म्हटलं, "ऑक्सिजनची कमतरता असलेल्या औषधाचा उल्लेख करणारी एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की हे औषध घेतल्यास ऑक्सिजनची पातळी त्वरित वाढेल. मात्र, हे अनव्हेरिफाय स्त्रोत्रांद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे."
आयुष मंत्रालयाने पुढे म्हटलं, आयुष मंत्रालया अशा अनव्हेरिफाय स्त्रोत्रांनी प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही जाहिरातीचं समर्थन करत नाही. कृपया गंभीर परिस्थितीत कुठलंही औषध स्वत:हून घेऊ नका. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Oxygen supply, Viral