Home /News /news /

Ratnagiri Curfew : अतिमुसळधार पावसाची शक्यता; जिल्ह्यात 11-12 तारखेला कर्फ्यू जाहीर

Ratnagiri Curfew : अतिमुसळधार पावसाची शक्यता; जिल्ह्यात 11-12 तारखेला कर्फ्यू जाहीर

Ratnagiri Curfew नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु, औषधांचा साठा करून ठेवावा आणि बाहेर पडणं टाळावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

    रत्नागिरी, 08 जून : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार (Weather Forecast) जिल्ह्यात अतिमुसळधार (Heavy Rain) पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं जिल्ह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस (Rain Upto 200mm) पडू शकतो. यामुळं 11 व 12 जून या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यु लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा  यांनी पत्रकार परिषदेत दिली. (वाचा-Weather Alert: मुंबईकरांनो सावधान! मान्सूनपूर्वीच मिळाली झलक; IMD ने दिला इशारा) रत्नागिरी जिल्ह्यात 11 व 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 12 जून नंतरदेखील पावसाचा धोका कायम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगर पालिका आणि 31 गावं धोकादायक आणि पूरग्रस्त असतात. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. या भागातील नागरिक व ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात येणार आहे. किनारी भागात उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर पावसाचा धोका असल्यानं किनारी भागातील ग्रामस्थांचं स्थलांतर केलं जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु, औषधांचा साठा करून ठेवावा आणि बाहेर पडणं टाळावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. (वाचा-डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन) पुराचा धोका लक्षात घेऊन जनावरांना बांधून ठेऊ नये, बोटी सुसज्ज ठेवणे, कुशल मनुष्यबळ तैनात ठेवणे, लाईफ बोटी यासह इतर सामग्रीची तयारी करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली आहे. कोविड सेंटरच्या ठिकाणी वीज खंडित झाल्यास जनरेटर पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसंच ऑक्सिजन बफर साठा देखील ठेवण्यात येणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत तुटवडा जाणवू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. गरज पडल्यास लगेच मदत करण्यासाठी बचाव पथकांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Monsoon, Rain, Ratnagiri, Weather, Weather forcast

    पुढील बातम्या