मुंबईत अजूनही मान्सून पोहोचल्याचं अधिकृतरीत्या जाहीर झालेलं नसलं तरी मंगळवारपासून पूर्वमोसमी पावसाने शहर आणि उपनगरात दमदार हजेरी लावली.
2/ 6
वादळी वाऱ्यासह आणि मध्यम ते तीव्र मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाण्यातही हजेरी लावली
3/ 6
10 तारखेपर्यंत मान्सून मुंबईत पोहोचेल आणि त्यानंतर दमदार बॅटिंग सुरू होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागाचे जयंता सरकार यांनी मुंबईसाठी Weekend Alert ही जारी केला आहे.
4/ 6
शुक्रवारपासून - 11 जून ते15 जून दरम्यान मुंबई, ठाणे आणि परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
5/ 6
सखल भाग आणि जीर्ण इमारतीत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे
6/ 6
पूर्व मान्सूनच्या सरींनंतर मुंबईच्या सायन भागात रस्ते पाण्याने भरले होते. मुंबईकरांना पुढच्या धोक्याची चुणूक या पावसानेच दिली.