Home /News /news /

Daily Horoscope : उद्या कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका, या राशींनी अधिक काळजी घ्या

Daily Horoscope : उद्या कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका, या राशींनी अधिक काळजी घ्या

दिनांक ३० मे २०२२ वार सोमवार आज वैशाख अमावस्या. सोमवती अमावस्या. दुपारी २.४९ पर्यंत आहे. आज श्री शनैश्चर जयंती आहे. श्री शनिदेवाच्या कृपेचा सर्व राशिना लाभ घडो हीच प्रार्थना.

आज दिनांक ३० मे २०२२ वार सोमवार आज वैशाख अमावस्या. सोमवती अमावस्या. दुपारी २.४९ पर्यंत आहे. आज श्री शनैश्चर जयंती आहे. श्री शनिदेवाच्या कृपेचा सर्व राशिना लाभ घडो हीच प्रार्थना. आज शनि दान, जप, व स्तोत्र पठण करावे. पितृ पूजन केल्याने फायदा होईल. आज चंद्र वृषभ राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य. मेष आर्थिक घडामोडींना वेग येईल. काही कर्ज वगैरे देऊ नका. मानसिक ताण जाणवेल. लग्नेश मंगळ गुरू सोबत आहे. लाभ होतील. दिवस मध्यम. वृषभ आयुष्यात नवीन घटनांची सुरुवात होईल. रवि बुध लाभाचे नवीन मार्ग देतील. राशीतील चंद्र काही नवीन जबाबदारी निर्माण करेल. शांत रहा. दिवस शुभ. मिथुन व्यय चंद्र मानसिक ताण निर्माण करेल. आज कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका. परदेशा बाबत शुभ फल मिळेल. दिवस शांततेत घालवा. कर्क आज कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. प्रकृतीची काळजी घ्या. लाभ स्थानात आलेले रवि राहू बुध अधिकाराचा अनुभव देतील. दिवस शुभ आहे. सिंह राशी स्वामी रवि सध्या सकारात्मक मानसिकता देईल. शरीरात ऊर्जा वाटेल. चंद्र कार्य क्षेत्रात विशेष वर्तमान आणेल. आज दिवस मध्यम जाईल. कन्या भाग्य चंद्र असून आज घरा विषयक काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जास्तीची जबाबदारी येईल. धार्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी होईल. दिवस चांगला. तुला घरात अशांतता निर्माण होईल असे वागू नका. कलह टाळा. जास्तीचे काम अंगावर घेऊ नका. प्रवास योग येतील. आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम आहे. पूजनात दिवस घालवा. वृश्चिक अतिशय धावपळीचा असा हा दिवस असणार आहे. खूप महत्वाचे निर्णय, फोन वर संवाद होतील. पण प्रवास टाळा. नुकसान होईल. दिवस मध्यम आहे. धनु आर्थिक बाबतीत जपून राहण्याचा दिवस आहे. काही व्यवहार असतील तर ते उद्यावर टाका. कुटुंबात काही अडचणी येतील. दिवस मध्यम. मकर शनि, पंचम चंद्र दिवस जरा कठीण जाईल. मन काहीसे उदास राहील. जोडीदाराची मदत घ्या. संततीला जपा. दिवस संथ आहे. कुंभ राशी स्थानात झालेली शनि ग्रहाची स्थिती आर्थिक आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. गुरू नियंत्रण ठेवेल. दिवस मध्यम आहे. मीन आज दिवस नातेवाईकांना भेट, संपर्क करण्याचा आहे. काहीशी हुरहूर जाणवत असली तरी शांत रहा. कोणी अधिकारी व्यक्ती भेटेल. प्रवास टाळा. दिवस शुभ. शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या