Home /News /news /

मालेगावात शासकीय रुग्णालयातच मारला छापा, धक्कादायक माहिती आली उजेडात

मालेगावात शासकीय रुग्णालयातच मारला छापा, धक्कादायक माहिती आली उजेडात

3500 पीपीई किट, 20 हजार मास्क, 2000 एम-95 मास्क, फेसशिल्ड मास्क, सॅनिटायझर, थर्मल मीटर, औषधी असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

मालेगाव, 6 मे: मालेगावात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. मनपा आयुक्त दीपक कासार यांनी 'वाडिया' शासकीय हॉस्पिटलवर छापा मारला आहे. 3500 पीपीई किट, 20 हजार मास्क, 2000 एम-95 मास्क, फेसशिल्ड मास्क, सॅनिटायझर, थर्मल मीटर, औषधी असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने हे साहित्य खरेदी केले होते. मात्र, हे साहित्य संबंधित कर्मचाऱ्यांना वाटप न करता शासकीय हॉस्पिटलच्या गोदामात लपवून ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. हेही वाचा.. गोल्डमॅनचं निधन, साडेआठ किलो सोन्यासह दिली होती राष्ट्रवादीची मुलाखत आयुक्त दीपक कासार यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी भांडारपाल राहुल ठाकूर व कदीर नामक कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात हॉस्पिटलमधील आणखी काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत तब्बल 55 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यामध्ये 8 पोलिस आणि 2 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. मालेगावात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 383 वर पोहोचली आहे. तर येवल्यात ही 16 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. येवल्यात कोरोनाबाधितांचा आकडा 25 झाला आहे. हेही वाचा.. उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या इम्तियाज जलील यांना भाजप नेत्याचं प्रत्युतर दुसरीकडे, मालेगाव शहरातील दुकाने सुरू होताच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. भाजीपाला, किराणा, दूध यासह इतर वस्तूंच्या दुकानांवर गर्दी झाली. त्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर 4 दिवसांपासून शहरात शंभर टक्के संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदीमुळे सर्व दुकाने बंद होती.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या