...तर राहुल गांधीच पंतप्रधान होणार : काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

...तर राहुल गांधीच पंतप्रधान होणार : काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

काँग्रेसला 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील असं काँग्रेसनं आज स्पष्ट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली,ता. 22 जुलै: लोकसभेच्या 2019 च्या निवडणूका या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत. काँग्रेसला 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील असं काँग्रेसनं आज स्पष्ट केलं. नव्या काँग्रेस कार्यकारीणीची आज पहिलीच बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भूमिका स्पष्ट केली. 2004 पेक्षा काँग्रेसची कामगिरी उत्तम असेल. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिला तर ज्या पक्षांना काँग्रेससोबत यायचं असेल ते पक्ष सोबत येवू शकतात मात्र त्याचं नेतृत्व हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या करणार विठ्ठलाची महापूजा, पण वर्षा बंगल्यावर

BLOG : आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी!

अमित शाहा लता मंगेशकर यांच्या भेटीला

अन्य पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसने एक समितीही स्थापन केली असून त्या समितीकडे प्रादेशिक पक्षांसोबत वाटाघाटी करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याबाबत उलट सुटल चर्चा असली तरी काँग्रेस सपासोबत आघाडी कायम ठेवणार आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस कमकूवत आहे त्या राज्यांमध्ये आघाडी करावी आणि जिथे पक्ष मजबूत आहे त्या राज्यांमध्ये निवडणूकीनंतर आघाडीबाबत विचार करावा असं मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केलंय.

महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी : अमित शहांचा कार्यकर्त्यांना आदेश

महाराष्ट्रासाठी अमित शहांचा 'अॅक्शन प्लान', या आहेत 16 महत्वाच्या गोष्टी

राहुल गांधी टीमची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत 2019 च्या लोकसभा निवडणूकीबाबत चर्चा करण्यात आली. येत्या वर्षभर काय भूमिका घेऊन पुढे जायचं. त्यासाठी काय कार्यक्रम तयार करायचा याचं मार्गदर्शन राहुल गांधी यांनी केलं. त्यामुळे राहुल गांधी येत्या काळात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2018 11:10 PM IST

ताज्या बातम्या