मुंबई,ता. 22 जुलै: मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार नाहीत. मात्र मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा करणार आहेत. ज्यावेळी पंढरपूरमध्ये महापुजेला सुरवात होईल त्याच वेळी वर्षामधल्या महापुजेला सुरूवात होणार आहे. पंढपूरला जाता आलं नाही तरी पूजेचा नेम चुकवणार नाही. मी माझ्या निवास्थानीच महापूजा करणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं.आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठी क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत मी पंढरपुरात जाणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मला खूप मोठी सुरक्षा आहे. मला कोणी हात नाही लावू शकत पण वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मी पंढरपूरात जाणार नाही.
माझ्या विठ्ठलाला मी घरात पुजेन पण माझ्यामुळे देशभरातल्या वारकऱ्यांना वेठीस घेतलेलं चालणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. मला कशाचीही भिती नाही पण वारकऱ्यांना याचा काही त्रास होऊ नये यासाठी मी हा निर्णय घेतला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मराठा मोर्चाला आरक्षण देणं हे सरकारच्या नाही तर आता न्यायालयाच्या हाती आहे. त्यामुळे ज्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही ते फक्त राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने वारकऱ्यांना आंदोलनाचा त्रास होऊ नये म्हणून पंढरपूरमधलं आंदोलन स्थगित केलं आहे. सोमवारी मराठा क्रांती मोर्चाचं पंढरपुरातलं आंदोलन होणार नाही. मात्र इतर ठिकाणी सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा औरंगाबाद संयोजक समितीनं दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Mahapuja, Maharashtra CM, Pandharpur, Varsha bungalow, Vitthal, पंढरपूर, महापूजा, मुंबई, वर्षा बंगला, विठ्ठल