पुणे, 21 जून : आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून आपण अनेक फळांच्या अथवा फळभाज्यांच्या रसाचे सेवन करतो. मात्र दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. पुण्यामध्ये दुधी भोपळ्याचा रस प्यायल्यानंतर ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तम आरोग्यासोबतच कोणताही आजार नसताना झालेल्या महिलेच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
टीव्हीचा आवाज वाढवला म्हणून मामाने दिले भाच्याला चटके
१२ जून रोजी संबंधित महिलेने ग्लासभर दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन केलं होतं. त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना जुलाब आणि उलट्या यांचा त्रास सुरू झाला. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पुढच्या तीन दिवसात तिची प्रकृती अधिकच खालावली आणि १६ जूनच्या मध्यरात्री तिचा मृत्यू झाल्याची माहिती महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे.
ना घोडा, ना गाडी, थेट जेसीबीतून घरी आणलं नवरीला !
याआधीही देशभरातदुधी भोपळ्याचा रस प्यायल्यानंतर मृत्यू होण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. २०११ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या समितीने दुधीचा रस कडू लागल्यास तो पिऊ नये, असं सांगितलं आहे. तसंच कडू दुधी भोपळ्यातील काही गोष्टींमुळे मृत्यू ओढावू शकतो, असं या समितीनं सांगितलं होतं.