कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवा शोध, रोबो करणार रुग्णांची प्राथमिक तपासणी

कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवा शोध, रोबो करणार रुग्णांची प्राथमिक तपासणी

कोरोनाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी एक विशिष्ट चालता बोलता रोबोटच पुणे कॅन्टॉनमेंटच्या आयटीआयने विकसित केला आहे.

  • Share this:

पुणे, 18 मे : पुणे शहर आणि परिसरात दररोज कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. अशा रूग्णांना विविध सेवा पुरविण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आयटीआय विभागाने रिमोट कंट्रोलवर आधारित एका रोबोची निर्मिती केली आहे. इतकंच नाही तर ऑटोमटिक सॅनिटायजर वेंडिग मशीन आणि ऑटो कोरोना लक्षणांची चाचणी करणारा रोबोदेखील तयार केला आहे.

कोरोनाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी एक विशिष्ट चालता बोलता रोबोच पुणे कॅन्टॉनमेंटच्या आयटीआयने विकसित केला आहे. यामुळे कोरोनाचे प्राथमिक निदान होण्यास मदत होणार आहे. हा चालता बोलता रोबोट नागरिकांचे स्क्रींनिग अगर तपासणीच करून थांबणार आहे, असे नाही. तर तो नागरिकांना आरोग्याबाबतचे विविध प्रश्न देखील विचारणार आहे. त्यासाठी खास वेगळी यंत्रणा या रोबोमध्ये विकसित करण्यात आली आहे.

रोबोटने विचारलेल्या प्रश्नांवर नागरिकांनी उत्तरे दिल्यानंतर संबधित रूग्णांस कोरोना वॉर्डमध्ये दाखल करावयाचे की, विलगीकरण कक्षात ठेवायचे याचा निर्णय रूग्णालयातील डॉक्टर घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात हा रोबोट रूग्णालयातील कॅज्युअल्टीमध्ये बसविण्यात येणार आहे. रोबोट चालता बोलता होण्यासाठी संगणकीकृत यंत्रणा बसविण्यात आली असून, नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरची सोय करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात काय आहे कोरोनाची स्थिती?

पुणे जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा चार हजारांच्या वर गेला आहे. रविवारी दिवसभरात सर्वाधिक 223 रुग्णांची वाढ झाली आहे. तर रविवारी 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 208 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावाला आहे, तर आत्तापर्यंत 2 हजार 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 18, 2020, 5:43 PM IST

ताज्या बातम्या