जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / रस्त्यावर विव्हळत होती गरोदर महिला, PMPML बसचालकाने जे केलं त्याबद्दल पुणेकरांना वाटेल अभिमान!

रस्त्यावर विव्हळत होती गरोदर महिला, PMPML बसचालकाने जे केलं त्याबद्दल पुणेकरांना वाटेल अभिमान!

रस्त्यावर विव्हळत होती गरोदर महिला, PMPML बसचालकाने जे केलं त्याबद्दल पुणेकरांना वाटेल अभिमान!

हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर आज या महिलेनं एका सुंदर अशा मुलीला जन्म दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

  पुणे, 11 एप्रिल : पुणे तिथे काय उणे…असं उगाच म्हटलं जात नाही. परंतु, सध्या कोरोना व्हायरसमुळे पुण्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पुण्याचे रस्ते सामसूम झाले आहे. परंतु, अशा या बेताच्या परिस्थितीत पुण्याच्या पीएमपीएमएल बसचालक आणि वाहकाने दाखवलेल्या माणुसकीने नवा आदर्श घडवून दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे राज्यभरात संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही बाहेर पडण्यास मनाई आहे. पुण्यातही या नियमांचं कडेकोट पालन केलं जात आहे. पुण्यातील रस्त्यावर अत्यावश्यक सेवा म्हणून पीएमपीएमएलच्या बस धावत आहे. सिंहगड रोड परिसरात रस्त्यावर वेदनेत असलेल्या गरोदर महिलेला पीएमपीएमएलच्या चालक आणि वाहकांनी प्रसंगवधान दाखवत तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडल्याची घटना समोर आली.

जाहिरात

सिंहगड रोडला अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या पीएमपीच्या फिरोज खान या चालकाला एक महिला रस्त्याच्या बाजूला वेदनेनं विव्हळत असल्याचं दिसल्यानंतर त्याने तात्काळ बस थांबवली. या महिलेची विचारपूस केली असता, प्रकृती नाजूक असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर फिरोज खान यांनी बसचा वाहक विजय मोरे यांच्या मदतीने या महिलेला बसमध्ये बसण्यास जागा करून दिली. हेही वाचा - लाडक्या लेकीसह ON POLICE DUTY, महिला पोलीस देतेय कोरोनाशी लढा! आता बस थेट हॉस्पिटलला नेली पाहिजे, असा निर्धार केला. त्यामुळे त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना बसमधून उतरण्याची विनंती केली. प्रवाशांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बसमधून उतरण्याचा निर्णय घेतला. वाहक मोरे यांनी सर्व प्रवाशांचे पैसे ही परत दिले. त्यानंतर बस पोहोचली थेट कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये. वेळीच या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या महिलेला ऐनवेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे हतबल होऊन ती हॉस्पिटलकडे निघाली होती. त्याचवेळी देवासारखे हे पीएमपीएमएलचे चालक धावून आले. हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये देश हादरला; 5 मुलींवर सामूहिक बलात्कार, एकीची हत्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर आज या महिलेनं एका सुंदर अशा मुलीला जन्म दिला आहे. ऐनवेळेवर मदतीसाठी धावून आलेल्या बस चालक फिरोज खान आणि वाहक विजय मोरे यांच्या या महिलेनं आणि तिच्या नातेवाईकांनी आभार मानले आहे. लॉकडाउन सारख्या बेताच्या परिस्थितीत गरोदर महिलेच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या फिरोज खान आणि विजय मोरे या दोन्ही कर्मचाऱ्यांचं प्रशासनाकडून कौतुक करण्यात आलं आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात