जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लाडक्या लेकीसह ON POLICE DUTY, महिला पोलीस देतेय कोरोनाशी लढा!

लाडक्या लेकीसह ON POLICE DUTY, महिला पोलीस देतेय कोरोनाशी लढा!

लाडक्या लेकीसह ON POLICE DUTY, महिला पोलीस देतेय कोरोनाशी लढा!

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वच प्रशासकीय यंत्रणा एकदिलाने काम करताना दिसत आहे. अनेक लोकं आपल्या कुटुंबापासून दूर राहात कोरोनाशी लढत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोलापूर, 11 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही हजारांच्या घरात पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी पोलीस अहोरात्र पहारा देत आहे. सोलापूरमध्ये अशीच एक महिला पोलीस कर्मचारी आपल्या लाडक्या लेकीला घेऊन कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वच प्रशासकीय यंत्रणा एकदिलाने काम करताना दिसत आहे. अनेक लोकं आपल्या कुटुंबापासून दूर राहात कोरोनाशी लढत आहे. मात्र, सोलापूर शहर पोलीस दलातील एक महिला पोलीस चक्क आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन कोरोनाविषयी जनजागृती करताना पाहायला मिळत आहे. वैशाली एकेली असं या कर्तव्यदक्ष महिला पोलिसाचे नाव आहे. सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत त्या आपली मुलगी जीविताला सोबत घेऊन कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी बाहेर पडतात. हेही वाचा - लॉकडाऊन हटवणार की सुरू राहणार? पंतप्रधान मोदींची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आपल्या मुलीला घरात सांभाळण्यासाठी कोणीही नसल्याने त्यांना नाईलाजाने सोबतच घेऊन फिरावे लागत आहे. असं असलं तरी आम्ही आमच्या कुटुंबाचे प्राण पणाला लावतो. मात्र, नागरिकांनी घरातच बसावे, असं आवाहन ते जनतेला करत आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांकडून त्याला सातत्याने हरताळ फासल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आतातरी नागरिकांनी घरात राहण्याला प्राधान्य देणे गरजेचं आहे. नाशिक SP आरती सिंह 15 तासांच्या ड्युटीमध्ये डॉक्टर बनून घेतात सगळ्यांची काळजी दरम्यान, नाशिकमध्ये लॉकडाउन दरम्यान कॅप्टन आरती सिंह, ज्या स्वत: एक डॉक्टर देखील आहेत. त्या केवळ कायदा व सुव्यवस्थाच नाही तर त्यांच्या कार्यसंघाच्या आरोग्याची देखील काळजी घेत आहेत. संपूर्ण टीमला एसपी आरती यांनी स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, ‘जर रोगाची कोणतीही लक्षणे दिसली तर घाबरू नका, सगळ्यात आधी मला कॉल करा.’ हेही वाचा - 25 मुलींच्या ऑडिशननंतर दीपिका झाली रामायणाची सीता, अशी झाली होती निवड प्रत्यक्षात डॉ. सिंह यांना 15-15 तास कर्तव्य बजावण्याविषयी अधिक काळजी आहे. मीटिंग्ज आणि वॉकी-टॉकीजमध्ये त्या सतत त्यांच्या आरोग्याबद्दल टीमला विचारत असतात. तसेच पोलीस कॉलनीत जाऊन महिला व मुलांशी संवाद साधतात. त्यांना सामाजिक अंतर दूर करणे, घराबाहेर पडू नये, कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचा आहार याविषयीही सल्ले दिले आहेत. डॉ. आरती यूपीच्या मिर्झापूरच्या आहेत. एमबीबीएसनंतर त्यांनी वाराणसीच्या सरकारी रुग्णालयातही काम केलं. दुसर्‍या प्रयत्नात, 2004 मध्ये यूपीएससी पास करत त्या आयपीएस झाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात