• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • पुण्याच्या 17 वर्षांच्या लेकीनं घेतला जगाचा निरोप, मात्र 6 जणांना दिलं नवजीवन

पुण्याच्या 17 वर्षांच्या लेकीनं घेतला जगाचा निरोप, मात्र 6 जणांना दिलं नवजीवन

पोटच्या लेकीच्या अचानक निधनामुळे आई-वडिलांवर दु: खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

  • Share this:
पुणे, 15 सप्टेंबर : ही बातमी आहे पुण्यातील (Pune News) पिंपरी-चिंचवडमधील. येथील एका मात्या-पित्याची आपल्या मुलीच्या मृत्यू नंतर तिचे अवयव दान करून सहा जणांचे प्राण वाचविण्यासाठीचा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आणि समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे. श्रुती बाबुराव नरे हिचा अचानक झालेला मृत्यू तिच्या कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. (Pune 17 year old girl dies after Organ donation rejuvenated 6 people) काही दिवसांपूर्वी श्रुतीला अचानक तीव्र स्वरूपाची डोकेदुखी सुरू झाली आणि ती चक्कर येऊन बेशुद्ध पडली. श्रुतीला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र काही वेळाने ती कोमात गेली. मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने श्रुतिचा ब्रेन डेड (Brain Dead) झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले आणि वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षात श्रुतीने जगाचा निरोप घेतला. श्रुतीच्या असं अकाली जाणं तिच्या आई-वडिलासाठी आघात होता. मात्र त्याही परिस्थितीत या माता पित्यांनी काळजावर दगड ठेवला आणि श्रुतीचे अवयव दान (Organ Donation) करण्याचा निर्णय घेतला. हे ही वाचा-पुण्यात अल्पवयीन मुलीचं धाडस; अत्याचारातून गरोदर राहिल्यानंतर गर्भपातास नकार श्रुतीसारखा अकाली मृत्यू कुणालाही येऊ नये. मात्र दुर्दैवाने कुणाला असा मृत्यू आलाच तर त्यांनी अवयव दानाचा निर्णय घेण्याच अवाहन डॉक्टरांनी केलं आहे. विशेष म्हणजे कोरोना नंतर अनेकांचे अंतर्गत अवयव निकामी होत असल्याची बाब समोर आली आहे. हृदय, किडणी, मूत्रपिंड असे अवयव मिळावेत या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या तर खूप मोठी आहे. त्यामुळे अवयव दान करणं महत्वाचं असल्याचं  सांगत अवयव दान कोण करू शकत आणि कोणत्या परिस्थिती करू शकतं या बद्दलही डॉक्टरांनी सांगितलं आहे. शरीराने आपल्यात नसलेली श्रुती अवयव रूपाने सहा जणांमध्ये जिवंत आहे. श्रुतीच्या आई-वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला News 18 लोकमताचा सलाम.
Published by:Meenal Gangurde
First published: