Home /News /news /

फक्त 3 दिवसांसाठी मिळालं आईचं प्रेम, प्रसूतीनंतर ठाण्यात शिक्षक महिलेचा मृत्यू

फक्त 3 दिवसांसाठी मिळालं आईचं प्रेम, प्रसूतीनंतर ठाण्यात शिक्षक महिलेचा मृत्यू

ठाण्याच्या कळवा इथल्या पारसिकनगरमधील शिक्षिकेचा प्रसूतीनंतर अवघ्या 3 दिवसांनी मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

    ठाणे, 01 मार्च : आई आणि लेकरांचं एक पवित्र नातं आहे. पण ठाण्यात हेच नातं सुरू होण्याआधी संपलं. ठाण्याच्या कळवा इथल्या पारसिकनगरमधील शिक्षिकेचा प्रसूतीनंतर अवघ्या 3 दिवसांनी मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षिकेने एक मुलगा आणि मुलगी अशा दोन बाळांना जन्म दिला. पण प्रसूती झाल्यानंतर 3 दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जगात पाय ठेवताच या लेकरांनी मायेची छाया गमावली आहे. ज्योती नीतिन बोरसे असं मृत्यू झालेल्या शिक्षिकेचं नाव आहे. ज्योती या प्रसूतीसाठी केईएम रुग्णालयात भरती झाल्या होत्या. गुरुवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. हे दोघे आता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती बोरसे या ठाणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के.आर. बोरसे यांच्या सून आहेत. ज्योती या मानपाडा इथल्या संकेत विद्यामंदिराच्या माध्यमिक विभागामध्ये भूगोल विषयाच्या शिक्षिका होत्या. गुरुवारी प्रसूतीच्या तीन दिवसांनंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून आता 3 दिवसांआधी जन्मलेल्या या चिमुकल्यांना कोण पाहणार असा मोठा प्रश्न आहे. हे वाचा - LPG Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या किंमती 53 रुपयांनी झाल्या कमी, हे आहेत मुंबई डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलांची प्रकृती उत्तम असून ते डॉक्टरांच्या निगराणीत आहेत. दरम्यान, ज्योती यांचा नेमका कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी त्यांच्या मूळगावी करण्यात आला. ज्योती यांच्या निधनामुळे बोरसे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. ज्योती यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या नेल्सन रुग्णालयात नेण्यात आलं आहे. ज्योती यांच्या पश्नाच त्यांचे पती, सासू-सासरे, दोन दीर आणि नणंद आहे. या सगळ्यांनी आता बाळांची जबाबदारी स्वीकारली आहे. हे वाचा : 5 मार्चपर्यंत पडणार पाऊस; महाराष्ट्रात गारा, वादळी वाऱ्याचा तडाखा
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या