बीड, 14 ऑक्टोबर : दोन समाजात फूट पाडून भाजपा राजकीय पोळी भाजून घेत आहे. भाजपचे राजकारण दंगलीशीवाय नाही. भाजप सत्ता मागतोय कशासाठी तर बॉम्ब फोडण्यासाठी. RSSचे मोहन भागवत यांचं नाव बॉम्ब ब्लास्टमध्ये असतानादेखील त्यांना पकडलं नाही. असा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपचे सरकार लुटारूचे सरकार आहे. भाजप संघटित गुन्हेगाराची टोळी आहे. मुख्यमंत्री म्हणतात एकही डाग नाही बेदाग आहोत. पण मी काँग्रेसला भुरटा चोर म्हणतो पण भाजप संघटित डाकू असल्याने भ्रष्टाचार करतांना पुरावे सोडत नाहीत. भाजपा ही संघटित टोळी आहे. त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. भाजपाने एका व्यासपीठावर यावं. मी त्यांना पुरावे देईन असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. ते बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बीड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अशोक हिंगे, गेवराईचे उमेदवार विष्णू देवकते, केजचे उमेदवार वैभव स्वामी, माजलगावचे उमेदवार धम्मानंद साळवे, परळीचे उमेदवार भीमराव सातपुते, आष्टीचे उमेदवार नामदेव सानप, शिवराज बांगर, अजिक्य चांदणे, विष्णू जाधव आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, भाजपाचे नवीन सरकार आल्यापासून आजपर्यंत 33 हजार कुटूंबानी देश सोडला 100 पासून 500 कोटीपर्यंत प्रॉपर्टी आहे. माझी ही माहिती खोटी आहे म्हणून सरकारने सांगावे विश्वास नाही म्हणून आम्ही देश सोडतोय असे अनेक उद्योजक सांगता आहेत. व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे. इतर बातम्या - उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीसांवर टीका, या मुद्द्यामुळे युतीत तडका शासनाकडे माणुसकी नाही संकटात सरकार आपल्या पाठीशी उभे राहत नाही. मग निवडून का द्यायचे असा प्रश्न उपस्थित केला. हे सरकार देशाला संकटात टाकत आहे. भाजपचे राजकारण आपल्या हिताचं नाही. काँग्रेस प्रमाणेच भाजपदेखील डागाळलेली आहे. सरकारी तिजोरी रिकामी झालेली आहे. आता लूट होणार आहे ती बँकांची लूट होणार आहे. आज भाजपला सवाल करणारा कोणीच नाही. पण आता वेळ आली आहे जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका टाळीसाठी शेतकऱ्याचा बळी दिला घात केला. अमेरिकेचा कापूस देशात आणून इथल्या शेतकऱ्यांचे नुकसान मोदी यांनी केले आहे असा घणाघात केला. इतर बातम्या - ‘दादा’ला मिळणार मोठी जबाबदारी; BCCIच्या अध्यक्षपदी होणार सौरव गांगुलीची निवड!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







