उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीसांवर टीका, या मुद्द्यामुळे युतीत तडका

उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीसांवर टीका, या मुद्द्यामुळे युतीत तडका

होर्डिंग्समध्ये दाखवलेली कामं या सरकारने जरूर केली आहेत पण या विकासकामांमध्ये शिवसेनेचादेखील सिंहाचा वाटा होता.

  • Share this:

नांदेड, 14 ऑक्टोबर : महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या विविध भागात मोदी आणि फडणवीस यांनी केलेल्या विकासकामांच्या होर्डिंग्स लागल्या आहेत. याच होर्डिंग्सवरून उद्धव ठाकरे यांनी मोदी-फडणवीसांवर निशाणा साधला आहे. होर्डिंग्समध्ये दाखवलेली कामं या सरकारने जरूर केली आहेत पण या विकासकामांमध्ये शिवसेनेचादेखील सिंहाचा वाटा होता. हे विरोधकांसह सर्वाना मान्य करावे लागेल असं म्हणत विकासाचे श्रेय शिवसेनेलाही असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सेनेने पाठिंबा दिला म्हणूनच हे सरकार स्तिर होतं हे सांगायलाही ते विसरले नाहीत. उद्धव ठाकरे नांदेड जिल्ह्यातील लोह इथं सभेत बोलत होते.

दरम्यान, शुगर आणि हार्टअॅटकसारखे आजार सर्वांना होतात. हार्ट अटॅक तपासणी आणि उपचारासाठी खूप खर्च येतो. मी त्याचा अनुभव घेतला आहे. मला वेळेवर उपचार मिळाले नसते तर मी आज तुमच्यासमोर उभा नसतो. म्हणूनच मी गरिबांच्या आरोग्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिलं आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

'औरंगाबाद की संभाजीनगर'

औरंगाबाद कr संभाजीनगर या विषयावर उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच असा खुलासा केला आहे. लोकसभेला थोडी गडबड झाली अन् आपल्या हक्काच्या संभाजीनगरमधील भगवा झेंडा खाली उतरला आणि तिथे दुर्दैवाने हिरवा झेंडा फडकतो आहे. हा हिरवा झेंडा रझाकारांच्या आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

राज ठाकरे 'मतलब निकल गया तो हम नही जानते'; भाजप नेत्याची जिव्हारी टीका

उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर टीका

आम्ही आमच्या वचननाम्यात १० रुपयात सकस आहार देण्याचे वाचन दिले आहे. पण शरद पवारांनी यात भ्रष्टाचार होईल असा संशय व्यक्त केला. खरंतर शरद पवारांनी अन्य कुणावरही भ्रष्टाचाराचे आरोप करावेत हाच खूप मोठा विनोद असल्याची ठाकरे यांनी कोटी केली आहे.

'दादा'ला मिळणार मोठी जबाबदारी; BCCIच्या अध्यक्षपदी होणार सौरव गांगुलीची निवड!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 07:47 AM IST

ताज्या बातम्या